शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 19:04 IST

Vijay Shah On Army Officer Sophia Qureshi: मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले.

मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान कर्नल सोफिया कुरेशी यांचे वर्णन दहशतवाद्यांची बहीण असे केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. विजय शहा यांच्या या वक्तव्यानंतर मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली असून काँग्रेसकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर, विजय शहा यांनी त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे आपल्या स्पष्टीकरणात म्हटले.

"ज्या लोकांनी आपल्या बहि‍णींच्या कपाळावरचे कुंकू पुसले, आम्ही त्यांच्याच बहिणीला पाठवून त्यांच्यावर कारवाई केली", असे विजय शहा एका कार्यक्रमात बोलताना दिसत आहेत. विजय शहा यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या कर्नल सोफिया यांच्याबद्दल वादग्रस्त करणारे भाजप नेते विजय शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते अब्बास हाफिज यांनी केली.

बिहार काँग्रेसने आपल्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट केली. त्यात असे म्हटले आहे की, "भाजप सरकारमधील मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी दहशतवाद्यांची बहीण आहे, असे वक्तव्य केले आहे. भारताची कन्या कर्नल सोफिया कुरेशी, जिचा सर्वांना अभिमान आहे, तिच्याबद्दल हे लज्जास्पद वक्तव्य करण्यात आले, तिचे वर्णन दहशतवाद्यांची बहीण म्हणून करण्यात आले. हा आपल्या बलाढ्य सैन्याचा अपमान आहे. या वक्तव्यानंतर भाजप त्यांचा राजीरामा स्वीकारेल का? पंतप्रधान मोदी आणि भाजप नेते याबद्दल माफी मागतील का?", असाही सवाल उपस्थित करण्यात आला.

काँग्रेसच्या आरोपानंतर विजय शाह यांनी स्पष्टीकरण दिले. "आमच्या पंतप्रधानांनी आपल्या बहिणींच्या कपळ्यावरील कुंकू पुसणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. माझ्या भाषणाचा वेगळा संदर्भ घेऊ नये. आपल्या बहिणींनी पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे", असे ते म्हणाले.

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरल