Rahul Gandhi : भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाने घेतला युवराजचा बळी; राहुल गांधींनी सरकारला धरलं धारेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 08:28 IST2026-01-21T08:27:13+5:302026-01-21T08:28:43+5:30
Congress Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ग्रेटर नोएडा येथे पाण्याने भरलेल्या एका खड्ड्यात बुडून इंजिनिअरचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Rahul Gandhi : भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाने घेतला युवराजचा बळी; राहुल गांधींनी सरकारला धरलं धारेवर
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ग्रेटर नोएडा येथे पाण्याने भरलेल्या एका खड्ड्यात बुडून इंजिनिअरचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शहरी भागातील व्यवस्थेच्या पतनाचे मुख्य कारण 'जबाबदारीचा अभाव' असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी म्हणाले की, भारतातील समस्या केवळ भ्रष्टाचार नाही, तर समाजात मुळापर्यंत पसरलेले लोभाचं व्यसन आहे, ज्याने प्रशासनाचं उत्तरदायित्व गिळंकृत केलं आहे.
शुक्रवारी ग्रेटर नोएडाच्या सेक्टर १५० मध्ये २० फुटांहून अधिक खोल आणि पाण्याने भरलेल्या एका खड्ड्यात कार कोसळल्याने २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर युवराज मेहता याचा मृत्यू झाला. पाण्यात पडल्यानंतर युवराज मदत मागत होता, पण कोणीच त्याच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. या प्रकरणावरून राहुल गांधींनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Roads kill
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 20, 2026
Bridges kill
Fires kill
Water kills
Pollution kills
Corruption kills
Indifference kills
India’s urban collapse isn’t about lack of money, technology, or solutions.
It’s about lack of accountability.
TINA : There Is No Accountability. pic.twitter.com/68d1JgNw5z
"पाणी खूप थंड होतं, म्हणून..."; इंजिनिअरच्या मृत्यू प्रकरणी वडिलांचा रेस्क्यू टीमवर गंभीर आरोप
राहुल गांधींनी 'X' (ट्विटर) वर पोस्ट केलं की, "रस्ते जीव घेत आहेत, पूल जीव घेत आहेत, आग जीव घेत आहे, प्रदूषण जीव घेत आहे, भ्रष्टाचार जीव घेत आहे आणि उदासीनता जीव घेत आहे. भारताच्या नागरी स्तरावरील पतनाचं कारण पैसा, तंत्रज्ञान किंवा उपायांची कमतरता नाही, तर उत्तरदायित्वाचा अभाव हे आहे." यासोबतच राहुल गांधींनी त्या प्रत्यक्षदर्शीचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्याने युवराजला वाचवण्याचा प्रयत्न केला होता.
हृदयद्रावक! "मी पाण्यात पडलो, मला वाचवा..."; मृत्यूशी झुंज देणाऱ्या लेकाचा वडिलांना शेवटचा कॉल
व्हिडिओमध्ये तो व्यक्ती असं म्हणताना दिसत आहे की, सरकारी विभागाच्या निष्काळजीपणामुळेच त्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर १५० मध्ये राहणाऱ्या युवराजसोबत घडलेली घटना अत्यंत भयानक आहे. रात्रीचा अंधार आणि दाट धुक्यामुळे त्याची कार भिंत तोडून खोल खड्ड्यात पडली. दोन तासांहून अधिक काळ तो मृत्यूशी झुंज देत होता. तो लोकांकडे मदतीसाठी याचना करत होता, मात्र प्रशासनाकडून त्याला कोणतीही मदत मिळाली नाही.