शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

घुसखोरांच्या संरक्षणासाठी काँग्रेस कायदा करण्याच्या तयारीत : मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 10:42 IST

बहुसंख्याकांना अल्पसंख्याक बनवणे हा काँग्रेसचा उद्देश

गोगमुख : सत्तेत आल्यानंतर घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी कायदा करण्याची तयारी काँग्रेसने सुरू केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मात्र, भाजप व त्याचे मित्रपक्ष काँग्रेसचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाहीत. धेमाजी जिल्ह्यातील गोगमुख येथील प्रचारसभेला संबोधित करताना मोदींनी घुसखोरांच्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षावर टीकेची झोड उठवली.

बहुसंख्याक समाजाला अल्पसंख्याक बनवणे व घुसखोरांची 'व्होट बँक' तयार करणे हा काँग्रेसचा उद्देश आहे. त्यांना संरक्षण देण्यासाठी एक नवीन कायदा आणण्याची भाषा काँग्रेस नेते उघडपणे करत आहेत. एवढचे नाही तर त्यांनी उघडपणे घुसखोरांचे समर्थन करणे सुरु केले आहे, असे ते म्हणाले. फाळणीच्या काळात मुस्लीम लीगने देशाच्या विभाजनाचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाच्या पाठीतही खंजीर खुपसला असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात भाजप पुन्हा सत्तेत आला तर आम्ही समान नागरी कायदा लागू करण्यासोबतच आसामची अस्मिता जपण्यासाठी 'सहाव्या अनुसूची' अंतर्गत आदिवासींचे संरक्षण करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

१० वर्षांत सेवा, सुशासन 

भाजपने १० वर्षांच्या राजवटीने आसाममध्ये 'सेवा', 'सुशासन' या नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. आधुनिक सुविधांची उभारणी केवळ भाजपच्या नेतृत्वाखालील 'एनडीए'च करू शकते, असे सर्व जण म्हणत आहेत. भाजप आसामच्या निवडणुकांमध्ये विजयाची 'हॅ‌ट्रिक' साधेल, तर काँग्रेस पराभवांचे 'शतक' पूर्ण करेल, असे नमूद करत भाजप पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास मोर्दी यांनी व्यक्त केला.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Congress plans law to protect infiltrators: Modi alleges.

Web Summary : Modi accuses Congress of planning a law to protect infiltrators for vote bank politics, dividing the country. BJP vows to implement Uniform Civil Code and protect Assam's identity.
टॅग्स :AssamआसामNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा