शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीची उद्या चर्चा

By admin | Updated: August 18, 2014 02:50 IST

राष्ट्रवादी काँग्रेसला जुन्या फार्म्युल्यानुसार ११४ जागा दिल्या जाणार होत्या, मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमुळे बदलेली वस्तुस्थिती पाहता राष्ट्रवादीने जागा वाढवून मागितल्या आहेत

हरीश गुप्ता, नवी दिल्लीकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस जागावाटपाबाबत येत्या मंगळवारी (दि. १९) रोजी चर्चा करणार आहे. जागावाटपाच्या नव्या फार्म्युल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सरचिटणीस प्रफुल्ल पटेल तसेच काँग्रेसच्यावतीने माजी संरक्षणमंत्री ए.के. अ‍ॅन्टनी आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल हे चर्चा करतील.राष्ट्रवादी काँग्रेसला जुन्या फार्म्युल्यानुसार ११४ जागा दिल्या जाणार होत्या, मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमुळे बदलेली वस्तुस्थिती पाहता राष्ट्रवादीने जागा वाढवून मागितल्या आहेत. राष्ट्रवादीने १४४ जागांसाठी जोर लावला असला तरी हा पक्ष १३० जागांवर सहमत होईल, असे मानले जाते. सध्या संपुआचा घटक नसलेल्या काही छोट्या पक्षांना उर्वरित जागा दिल्या जाऊ शकतात. अन्य पक्षांना सामावून घेतानाच रालोआतील घटक पक्षांमधील असंतोष धर्मनिरपेक्ष शक्तींना बळकटी देणारा ठरू शकतो, असा राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या समीक्षेचा कल असून त्याबाबत काँग्रेसला माहिती देण्यात आली आहे.दरम्यान, हरियाणात ओमप्रकाश चौटाला यांचा आयएनएलडी हा पक्ष दुसऱ्या स्थानी आल्यास काँग्रेसची तिसऱ्या स्थानी पिछेहाट होईल. भाजपाने कुलदीप बिश्नोई यांच्या हरियाणा जनहित काँग्रेसशी युतीचे प्रयत्न चालविले आहेत. निवडणुकीचा कल पाहून काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजपाकडे धाव घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. बीरेंदरसिंग, अवतावरसिंग भदाना यांच्यासारख्या नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकण्याची तयारी केली आहे.