शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तू इधर उधर की न बात कर, ये बता की काफिला कैसे लुटा; पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 07:12 IST

राहुल गांधी यांचे मोदी यांच्यावर सतत हल्ले सुरू आहेत. मंगळवारी मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणानंतर गांधी यांनी पुन्हा हल्ला केला.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : सरकारने प्रत्येक गरीब व्यक्तीच्या खात्यात सहा महिने साडेसात हजार रुपये टाकावेत म्हणजे देशाची अर्थव्यवस्था परत रुळांवर आणता येईल, अशी सूचना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा केली आहे.

गांधी यांचे मोदी यांच्यावर सतत हल्ले सुरू आहेत. मंगळवारी मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणानंतर गांधी यांनी पुन्हा हल्ला केला. ते म्हणाले, ‘‘तू इधर उधर की न बात कर, ये बता की काफिला कैसे लुटा, मुझे रहजनों से गिला तो है, पर तेरी रहबरी का सवाल है.’’राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्तरावर सरकारविरोधात आघाडी सांभाळली तर पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारवर हल्ले करीत होत्या.

प्रियांका गांधी यांनी राज्य सरकारने रोजगार देण्याच्या दिलेल्या आश्वासनांवर हल्ला करताना म्हटले की, ‘‘आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये जवळपास दीड लाख लोक आता मुंबईत परतले आहेत. राज्य सरकारने एका आयोजनाच्या माध्यमातून राज्यात असलेल्या भयंकर बेरोजगारीला झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला; परंतु वस्तुस्थिती समोर आलीच. वस्तुस्थिती जाहिरातींच्या माध्यमांतून किती झाकून ठेवणार?’’ असा प्रश्न प्रियांका गांधी यांनी विचारला.चीनच्या सैन्याला कसे हटविणार?

  • राहुल गांधी मोदी यांचे नाव घेऊन म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांत कोरोनाने हिंदुस्तानची अर्थव्यवस्था नष्ट केली. आम्ही सरकारला तीन-चार वेळा सूचना केल्या होत्या.
  • ‘न्याय’ योजनेसारखी एक योजना लागू करावी, कायमस्वरूपी जरी नसली तरी सहा महिन्यांसाठी राबवावी, प्रत्येक गरीब कुटुंबाच्या बँक खात्यात दरमहा साडेसात हजार रुपये टाकावेत. यामुळे मागणी निर्माण होईल व पुन्हा अर्थव्यवस्था सुरू होईल. सरकारने हे मान्य केले नाही.
  • एकदा नव्हे तर ३-४ वेळेस सरकारने नाही म्हटले. कारण सांगितले की, आमच्याकडे पैसे नाहीत. सरकारने सगळ्यात श्रीमंत १५ जणांचा कर माफ केला होता आणि गेल्या तीन महिन्यांत सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवले आहेत. २२ वेळा सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवून तीन लाख कोटी रुपये सरकारकडे आले आहेत. त्यामुळे आमच्याकडे पैसा नाही असे म्हणणे योग्य नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
  • राहुल गांधी यांनी चीनवरून सरकारला नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन थेट प्रश्न विचारला की, ‘‘चीनने हिंदुस्तानची पवित्र जमीन हिसकावली आहे. आम्हाला सगळे माहीत आहे की, चीन लडाखमध्ये चार जागी आत येऊन बसला आहे. मोदी जी, तुम्ही देशाला सांगावे की, चीनचे सैन्य तुम्ही हिंदुस्तानमधून केव्हा आणि कसे काढणार?’’
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन