शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने

By admin | Updated: August 7, 2015 01:12 IST

भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या काँग्रेसच्या २५ खासदारांना...

घोटाळेबाज मंत्री हटवा : २५ खासदारांचे निलंबन रद्द करागडचिरोली : भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या काँग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे गुरूवारी दुपारी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार यांच्या नेतृत्वात ही निदर्शने करण्यात आली. ३ आॅगस्ट रोजी लोकसभेत भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या काँग्रेसच्या २५ खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी पाच दिवसांकरिता निलंबित केले. ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी केला. काँग्रेस खासदारांचे निलंबन रद्द करा, संपूर्ण कर्जमुक्ती करा, शेतमालाला योग्य भाव द्या अशा मागण्या करणाऱ्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. शिवाय ‘वारे मोदी तेरा खेल-सस्ती दारु महंगा तेल’, ‘लोकशाहीची हत्या करणाऱ्या बीजेपी सरकारचा निषेध असो’ अशा आक्रमक घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या. या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सचिव हसनअली गिलानी, प्रदेश काँग्रेसचे सदस्य रवींद्र दरेकर, जिल्हा उपाध्यक्ष पी. आर. आकरे, सेवादल अध्यक्ष राजू गारोदे, युवक काँग्रेसचे लोकसभा महासचिव संतोष आत्राम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, डी. डी. सोनटक्के, महेंद्र ब्राम्हणवाडे, नंदू वाईलकर, पंडितराव पुडके, प्रभाकरराव वासेकर, सी. बी. आवळे, नरेंद्र भरडकर, सतिश विधाते, पांडुरंग घोटेकर, रजनिकांत मोटघरे, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, जीवन कुत्तरमारे, पुरूषोत्तम मेश्राम, देवेंद्र भांडेकर, शेखर आखाडे, आकाश बगेल, सुमित बारई, जगदिश पडियाल, गंगाधर म्हस्के, महादेव भोयर, डी. एम. वेलादी यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)