शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी कार्यकर्त्याला दिलं कुत्र्यानं न खाल्लेलं बिस्किट? भाजपचा दावा, शेअर केला VIDEO 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 12:58 IST

यापूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावरही कार्यकर्त्यांसंदर्भात अपमानास्पद भाष्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भाजपने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी कुत्र्याला दिलेले बिस्किट कार्यकर्त्यांला दिले, असे भाजपने म्हटले आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओदेखील भाजपने शेअर केला आहे. यापूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावरही कार्यकर्त्यांसंदर्भात अपमानास्पद भाष्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

काय होतं संपूर्ण प्रकरण - 
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, 'काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष खर्गे जी यांनी पक्षाच्या बूथ एजंटची तुलना कुत्र्यासोबत केली होती आणि इकडे राहुल गांधी त्यांच्या दौऱ्यात एका कुत्र्याला बिस्किट देत आहेत. मात्र कुत्र्याने ते बिस्किट खाल्ले नाही, यानंतर त्यांनी तेच बिस्किट त्यांच्या एका कार्यकर्त्याला दिली.'

एवढेच नाही तर, "ज्या पक्षाचा अध्यक्ष आणि युवराज आपल्या कार्यकर्त्यांसोबत कुत्र्यासारखा व्यवहार करत असतील तर, असा पक्ष लुप्त होणे स्वाभाविक आहे."

खर्गेंवर काँग्रेस नेत्यानंच साधला निशाणा - 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा एक व्हिडिओ शेअर निशाणा साधला आहे. ते म्हणाले,  'कार्यकर्ता कुत्रा नसतो, कर्मठ आणि कर्मवीर असतो. माननीय अध्यक्ष जी, हे कडवे नक्की आहे, पण सत्य आहे.' महत्वाचे म्हणजे, त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेलेली पोस्ट खर्गेंशिवाय वायनाडचे खासदार राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनाही टॅग केले आहे.
 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेdogकुत्रा