"असं काय घडलं?; की मोदी पंतप्रधान असताना चीननं भारताची जमीन हिसकावली"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 02:43 PM2020-07-12T14:43:52+5:302020-07-12T14:50:18+5:30

एक बातमी ट्विट करत राहुल गांधींनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.

congress leader rahul gandhi attacked modi government over the ladakh face off | "असं काय घडलं?; की मोदी पंतप्रधान असताना चीननं भारताची जमीन हिसकावली"

"असं काय घडलं?; की मोदी पंतप्रधान असताना चीननं भारताची जमीन हिसकावली"

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी लडाख मुद्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारला घेरले आहे.राहुल गांधींनी एक बातमी ट्विट करत हा प्रश्न उपस्थित केला आहे. भारत-चीन सैनिकांत झालेल्या हिंसक झटापटीपासून राहुल गांधी सात्याने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी लडाख मुद्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारला घेरले आहे. राहुल गांधी म्हणाले, असे काय घडले? की पंतप्रधान नरेंद्र मोदी असताना भारत मातेची पवित्र जमीन चीनने हिसकावून घेतली.

राहुल गांधींनी एक बातमी ट्विट करत हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये एका संरक्षण तज्ज्ञाने दावा केला आहे, की केंद्र सरकार एलएसीच्या मुद्द्यावर चीनसोबतच्या तणावासंदर्बात माध्यमांची दिशाभूल करत आहे. गलवान खोऱ्यातील या स्थितीमुळे देशाचे मोठे नुकसान होईल.

ही बातमी ट्विट करत राहुल गांधी यांनी म्हटले आहे, 'असे काय घडले, की मोदी जी असताना भारत मातेची पवित्र जमीन चीनने हिसकावून घेतली?'

लडाखमध्ये गलवान खोऱ्यात भारत-चीन सैनिकांत झालेल्या हिंसक झटापटीपासून राहुल गांधी सात्याने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. या प्रकरणावर राहुल गांधी म्हणतात, पंतप्रधान मोदी चीनच्या दाव्यांसोबत आहेत. मात्र, ते आपल्या सैनिकांसोबत उभे असल्याचे दिसत नाही. 

राहुल गांधी म्हणाले होते, की चीनने आपली जमीण बळकावली. भारत ती मिळवण्यासाठी चर्चा करत आहे. चीन म्हणतोय, की ती भारताची जमीन नाही. पंतप्रधानांनी सार्वजनिकरित्या चीनच्या दाव्याचे समर्थन केले आहे. पंतप्रधान चीनचे समर्थन का करत आहेत आणि भारतीय सैनिकांचे समर्थन का करत नाहीत. गलवान मुद्द्यावर झालेल्या  सर्व पक्षीय बैठकीत मोदी म्हणाले होते, भारतीय सीमेत कुणीही घुसलेले नाही तसेच कुणीही भाराच्या भूमीवर कब्जा केलेला नाही.
 
गेल्या 15 जूनच्या रात्री लद्दाखमध्ये एलएसीवर गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांबोत झालेल्या हिंसक झटापटीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले होते. तेव्हापासून राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : आता उत्तर प्रदेशात लॉकडाउनचा नवा फॉर्म्युला, असा आहे योगी सरकारचा 'प्लॅन'

CoronaVirus : मोलकरणीच्या नावानं पाठवलं पत्नीचं Corona सॅम्पल, रिपोर्ट आला पॉजिटिव्ह!; मग...

CoronaVirus : जगातील दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये भारताचा वाटा वाढला, 'या' गोष्टींनी वाढवली देशाची चिंता

धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'

CoronaVirus News: कोरोना व्हायरसवरील सर्वात प्रभावी, सुरक्षित अन् स्वस्त औषध 'Dexamethasone'; संशोधकांचा दावा

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

Web Title: congress leader rahul gandhi attacked modi government over the ladakh face off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.