CoronaVirus Marathi News india daily global cases now 12 percent positivity rate  | CoronaVirus : जगातील दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये भारताचा वाटा वाढला, 'या' गोष्टींनी वाढवली देशाची चिंता

CoronaVirus : जगातील दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये भारताचा वाटा वाढला, 'या' गोष्टींनी वाढवली देशाची चिंता

ठळक मुद्दे महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकड्याने 10 हजारचा टप्पा ओलांडला आहे. नव्या कोरोना रुग्णांच्या बाततीत जागतीक पातळीवर भारतचा शेअर वाढला आहे.जगाच्या लोकसंख्येत भारताचा वाटा 17.5 टक्के एवढा आहे.

नवी दिल्ली - संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार घातला आहे. भारतही घातक कोरोना व्हायरसचा सामना करत आहे. मात्र अशातच शनिवारी आलेले आकडे देशाच्या दृष्टीने भीती वाढवणारे आहेत. या आकड्यांचा विचार करता, नव्या कोरोना रुग्णांच्या बाततीत जागतीक पातळीवर भारतचा शेअर वाढला आहे. तर महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकड्याने 10 हजारचा टप्पा ओलांडला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढणे ही आधिपासूनच धोक्याची घटना आहे. 

जागतीक पातळीवर भारताचा शेअर वाढला -
कोरोनाबाधित रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रोज नवा आणि विक्रमी आकडा समोर येत आहे. यातच डेली ग्लोबल केसेसमध्ये (जागतीक पातळीवर रोज वाढणारी रुग्ण संख्या) भारताचा शेअर 12 टक्के झाला आहे. शुक्रवारपर्यंत हेच प्रमाण 11.8 टक्के होते.

महाराष्ट्रात कोरोना अधिक घातक -
कोरोनामुळे महाराष्ट्रात शनिवारी 223 जणांचा मृत्यू झाला. याच बरोबर महाराष्ट्रातील मृतांच्या आकड्याने 10 हजारचा टप्पाही ओलांडला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 22,123 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 45 टक्के मृत्यू केवळ महाराष्ट्रात झाले आहेत.

पॉझिटिव्हिटी रेट वाढला -
देशातील कोरोना व्हायरस पॉझिटिव्हिटी रेट सातत्याने वाढत आहे. हा चिंतेचा विषया आहे. एकूण टेस्टवर किती रुग्ण पॉझिटिव्ह आढळले हे पॉझिटिव्हिटी रेटवरून समजते. भारतात 20 जूनला हा रेट 6 टक्क्यांच्या पुढे होता. सध्या हा रेट 7.09च्या  जवळपास आहे. अधिक कोरोना प्रभावित राज्यांमध्ये हा अधिक आहे. जसे महाराष्ट्रात हा रेट 19 टक्क्यांपर्यंत आहे.

लोकसंख्येच्या दृष्टाने आकडा अधिक नाही -
जागतीक कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत भारताचा वाटा वाढणे हे निश्चितपणे चिंताजनक आहे. मात्र, लोकसंख्येचा विचार करता तेवढे चिंताजनकही नाही. कारण जगाच्या लोकसंख्येत भारताचा वाटा 17.5 टक्के एवढा आहे.

देशभरात एकाच दिवसात २७,११४ नवे रुग्ण
देशभरात शनिवारी एकाच दिवसात कोरोनाचे २७ हजार १४४ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८ लाख २० हजार ९१६ इतकी झाली आहे. या संसर्गाने आणखी ५१९ जण मरण पावले असून बळींची संख्या २२ हजार १२३ इतकी झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले. देशात अवघ्या तीन दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या सात लाखांवरून आठ लाखांवर गेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'

CoronaVirus News: कोरोना व्हायरसवरील सर्वात प्रभावी, सुरक्षित अन् स्वस्त औषध 'Dexamethasone'; संशोधकांचा दावा

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

English summary :
CoronaVirus Marathi News and Live Updates: india daily global cases now 12 percent positivity rate 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News india daily global cases now 12 percent positivity rate 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.