CoronaVirus : मोलकरणीच्या नावानं पाठवलं पत्नीचं Corona सॅम्पल, रिपोर्ट आला पॉजिटिव्ह!; मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 12:09 PM2020-07-12T12:09:36+5:302020-07-12T12:19:33+5:30

पत्नीत कोविड-19ची लक्षणे आढळून आल्यानंतर एका डॉक्टरने आपल्या घरातील मोलकरणीच्या नावाने पत्नीचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले. हे सॅम्पल पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांचा चमू संबंधित मोलकरणीच्या घरी पोहोचला. मग...

CoronaVirus Marathi News singrauli doctor sent wife's corona sample for the test as maid name, report came positive  | CoronaVirus : मोलकरणीच्या नावानं पाठवलं पत्नीचं Corona सॅम्पल, रिपोर्ट आला पॉजिटिव्ह!; मग...

CoronaVirus : मोलकरणीच्या नावानं पाठवलं पत्नीचं Corona सॅम्पल, रिपोर्ट आला पॉजिटिव्ह!; मग...

Next
ठळक मुद्देडॉ. सिंह यांच्यासर कुटुंबातील 2 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या 33 सरकारी कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.सांगण्यात येते, की आरोपी डॉक्टरने माहिती लपवण्याच्या हेतून असे पाऊल उचलले.

भोपाळ -मध्य प्रदेशातील सिंगरोली येथील एका सरकारी डॉक्टरवर कोरोना पॉझिटिव्ह पत्नीची माहिती लपवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. आरोपी डॉक्टरने उत्तर प्रदेशात एका लग्नाला हजेरी लावलेल्या आपल्या पत्नीचे सॅम्पल मोलकरणीच्या नावाने पाठवले. पत्नीमध्ये कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर हे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सांगण्यात येते, की आरोपी डॉक्टरने माहिती लपवण्याच्या हेतून असे पाऊल उचलले. आता या डॉक्टरविरोधात महामारी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, सिंगरोली येथील खुटार आरोग्य केंद्रातील बीएमओ डॉ. अभय रंजन सिंह आपल्या कुटुंबासह उत्तर प्रदेशातील बलिया येथे 23 जूनला एक लग्न समारंभास सहभागी होण्यासाठी गेले होते. ते 1 जुलौला परतले. मात्र, यानंतर स्वतःला आणि पत्नीला क्वारंटाइन करण्याऐवजी ते काम करतच राहिले. याचदरम्यान त्यांच्या पत्नीत कोविड-19ची लक्षणे आढळून आली. यानंतर संबंधित डॉक्टरने आपल्या घरातील मोलकरणीच्या नावाने पत्नीचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले. हे सॅम्पल पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांचा चमू संबंधित मोलकरणीच्या घरी पोहोचला. यानंतर आरोपीने फसवणूक केल्याचे उघड झाले.

डॉक्टरही कोरोना पॉझिटिव्ह -
खुलासा झाल्यानंतर आरोग्य विभागाचा चमू बीएमओ डॉ. सिंह यांच्या घरी पोहोचला. यावेळी कुटुंबातील इतर सदस्यांचीही तपासणी केली गेली. यात डॉ. सिंह यांच्यासर कुटुंबातील 2 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. 

सिंगरोलीचे बेढन पोलीस ठाण्यातील प्रभारी अरुण पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, महामारी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते व्हायरल संक्रमणातून बरे आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. सध्या डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या 33 सरकारी कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यात एका उप-विभागीय दंडाधिकाऱ्याचाही समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : जगातील दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये भारताचा वाटा वाढला, 'या' गोष्टींनी वाढवली देशाची चिंता

धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'

CoronaVirus News: कोरोना व्हायरसवरील सर्वात प्रभावी, सुरक्षित अन् स्वस्त औषध 'Dexamethasone'; संशोधकांचा दावा

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

Web Title: CoronaVirus Marathi News singrauli doctor sent wife's corona sample for the test as maid name, report came positive 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.