शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

समारोपालाही रंगले मानापमान नाट्य

By admin | Updated: August 12, 2016 01:12 IST

लोकप्रतिनिधी आखाड्यांची नाराजी

लोकप्रतिनिधी आखाड्यांची नाराजीनाशिक : दर बारा वर्षांनी येणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सांगतेलाही शुभारंभाप्रमाणेच मानापमान व नाराजी नाट्याला सामोरे जावे लागले.व्यासपीठावर ठरावीक आखाड्यांच्या महंतांनाच बोलाविल्याने अन्य आखाड्यांच्या काही महंतांनी नाराजी व्यक्त केली. तर पंचायत समिती स्तरावरील लोकप्रतिनिधींना डावलल्याने त्यांनीही नाराजी व्यक्त केली. सिंहस्थ कुंभमेळ्याची सांगता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली असताना त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या वतीने दुपारनंतर कुशावर्ताच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले. अगदी सायंकाळी कुशावर्तावर विद्युत रोषणाई करण्यात आली. मुख्य समारंभ सुरू होण्यापूर्वी अगदी काही मिनिटे अगोदर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या वतीने नगरसेवकांना पासेसचे वितरण करण्यात आले. त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे उपसभापती शांताराम मुळाणे यांनी तर जाहीरपणे नाराजी व्यक्त करताना सांगितले की, सिंहस्थात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची यंत्रणा राबलेली असताना ना जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांचा सत्कार झाला ना त्र्यंबकेश्वर पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. तसेच पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधींना सन्मानाने व्यासपीठावर बसविण्याऐवजी समोरील बाजूस बसविण्यात आले. अग्नी आखाड्याचे महंत ब्रšाचारी अभियानानंद यांनी सांगितले की, सर्व दहाही आखाड्यांना निमंत्रण दिलेले असले तरी, ठरावीक आखाड्यांच्या महंतांनाच व्यासपीठावर बसविण्यात आले. चार ते पाच व्यक्तींना व्यासपीठावर बसवून सोहळा कसा होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. अशाच काही प्रतिक्रिया काही महंत व लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्याने शुभारंभाला जसे साधूंचे मानापमान नाट्य रंगले, थेट शाही स्नानावर महंतांनी जसा बहिष्कार टाकण्याचा इशारा देऊन प्रशासनाची जशी धावपळ उडविली होती तसेच सिंहस्थाच्या समारोपालाही मानापमान नाट्य रंगल्याचे पहावयास मिळाले. (प्रतिनिधी)