शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांचे आबा (१)

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

कार्यकर्त्यांचे आबा

कार्यकर्त्यांचे आबा
नागपूरकरांचा गहिवर : असंख्य आठवणी

अजय पाटील
'सत्ता, संपत्ती येते आणि जाते पण जोडलेली माणसे आणि जीवाभावाचे मित्र, हीच आपली खरी संपत्ती असते असे मी मानतो अन् म्हणूनच मी आयुष्यभर माणसे जोडत आलो आहे', असे अभिमानाने सांगणारे व माणसे जोडण्याचे व्रत अविरत जपणारे आऱआऱ पाटील म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आबा आज नाहीत़ परंतु त्यांच्या सोबतच्या आठवणी मात्र माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यापासून तर सत्तेतील त्यांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांपर्यंत कुणालाही विसरता येणार नाहीत़
त्यांचे नागपूर-विदर्भावर विशेष प्रेम होते़ शासकीय वा पक्षाच्या कार्यक्रमासाठी आबा नागपुरात आले की अगदी घरच्यासारखे वागायचे़ राज्याचे उपमुख्यमंत्री असतानाही कधी तो बडेजाव त्यांनी मिरवला नाही़ आज त्यांच्या जाण्याने जुन्या आठवणी मनात दाटून आल्या आहेत.
गडचिरोलीच्या दौऱ्यावरून परत येत असताना एका गावात महिला व दोन तीन नागरिक रस्त्यावर उभे होते. त्यांनी हात दाखविताच आबांनी गाडी थांबविली. पोलिसांनी लगेच गराडा घातला. गाडी थांबवणारी ती महिला शहीद जवानाची आई होती. आबांनी क्षणाचाही विलंब न करता तिचे सर्व म्हणणे ऐकून घेतले अन् सात दिवसात तिला न्याय मिळवून दिला़ दुसरी आठवण उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावरची़ त्यांना नागपूरला यायचे होते़ त्यांनी कळवले, मी सामान्य कार्यकर्त्यांचा नेता आहे. मी आमदार निवासात राहणार. एकदा गुडीपाढव्याच्या पूर्वसंध्येला आबा नागपुरात होते. त्यांना मी विचारले आबा तुम्ही निघणार आहात का? त्यावर आबा म्हणाले, तुझे घर माझेच आहे. येथेच गुढी उभारतो. सकाळी घरी आले अन् त्यांच्याच हाताने आम्ही गुढी उभारली.