शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कम्युनिस्ट ३४ वर्षे कुंभकर्णासारखे झोपले होते - ममता बॅनर्जी

By admin | Updated: October 10, 2015 11:26 IST

कम्युनिस्ट पार्टी ३४ वर्षे सत्तेत असताना कुंभकर्णासारखी जोपली होती, आणि आता आम्ही चांगलं काम करतोय तर त्यात ते खोडा घालतायत अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केली

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १० - कम्युनिस्ट पार्टी ३४ वर्षे सत्तेत असताना कुंभकर्णासारखी जोपली होती, आणि आता आम्ही चांगलं काम करतोय तर त्यात ते खोडा घालतायत अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केली आहे. राज्य सरकार करत असलेल्या विकासाला बाधा आणताना CPM हिंसक कारवाया करत असल्याचं बॅनर्जी म्हणाल्या. सीपीएमचे नेते आमच्या यशावर जळत असून त्याला काही इलाज नसल्याचेही त्या म्हणाल्या. बंगालची ३४ वर्षांच्या राजवटीत सीपीएमने वाट लावल्याचा आरोप करताना आम्ही विकासाची गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा ममतादीदींनी केला आहे.
CPM ला जनतेने नाकारले असून आता त्यांनी गप्प बसावे असे सांगताना जो उड्डाणपूल त्यांनी करायला हवा होता तो ४५५ कोटी रुपये खर्चून आमच्या सरकारने केल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातला सगळ्यात मोठ्या ४.३ किलोमीटर पूलाचे उद्घाटन ममतादीदींनी केले.
राज्यात ४००० कि.मीच्या महामार्गाचे काम करण्यात येत असून त्यातील १००० किमीचे काम राज्य सरकार करणार आहे. तसेच कोलकात्यातील पायाभूत सुविधा दिल्ली व बंगळूरपेक्षा चांगल्या करण्यात येतील असं आश्वासनही त्यांनी दिलं.