शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांनी केला भेदभाव सहा अभियंत्यांचे निलंबित प्रकरण : सर्वपक्षीय नगरसेवक ठिय्या आंदोलन करणार

By admin | Updated: October 14, 2015 22:54 IST

जळगाव : मनपाच्या नगररचना विभागातील सहा अभियंत्यांनी महासभेच्या ठरावाविरुद्ध दिलेल्या पत्रामुळे संबंधित अभियंत्यांना निलंबित करण्याचा ठराव झाला होता. अशा परिस्थितीत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी सहापैकी फक्त चार अभियंत्यांना निलंबित केले. उर्वरित दोन अभियंत्यांना क्लीन चिट देत आयुक्तांनी भेदभाव केल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी बुधवारी पत्रपरिषदेत केला. याविरोधात आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतला आहे.

जळगाव : मनपाच्या नगररचना विभागातील सहा अभियंत्यांनी महासभेच्या ठरावाविरुद्ध दिलेल्या पत्रामुळे संबंधित अभियंत्यांना निलंबित करण्याचा ठराव झाला होता. अशा परिस्थितीत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी सहापैकी फक्त चार अभियंत्यांना निलंबित केले. उर्वरित दोन अभियंत्यांना क्लीन चिट देत आयुक्तांनी भेदभाव केल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी बुधवारी पत्रपरिषदेत केला. याविरोधात आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतला आहे. उपमहापौर सुनील महाजन यांच्या दालनात पत्रपरिषद झाली. यावेळी नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे, अनंत जोशी, नितीन बरडे, विनोद देशमुख उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीचा देखावा...उपमहापौर सुनील महाजन म्हणाले, सहा अभियंत्यांना निलंबित करण्याचा ठराव एप्रिलमध्ये झाला होता. या ठरावावर प्रत्यक्ष पाच महिन्यानंतर कार्यवाही झाली. ती पण निष्पक्षपणे झालेली नाही. सहा पैकी केवळ चार अभियंत्यांनाच निलंबित करण्यात आले. उर्वरित दोन अभियंतेही त्यात दोषी असताना, त्यांच्यावर कारवाई का केली नाही? असा प्रश्न आयुक्तांना मंगळवारी उपस्थित केल्यानंतर त्यांनी सामाजिक बांधिलकीतून निर्णय घ्यावे लागतात, असे म्हटले आहे. यापूर्वी अनेकांचे निलंबन झाले. तेव्हा सामाजिक बांधिलकी कुठे गेली होती? असा सवाल, उपमहापौर महाजन यांनी उपस्थित केला. समान कारवाई हवी डॉ. अश्विन सोनवणे म्हणाले, की सर्वांवर समान कारवाई होणे अपेक्षित होते. या प्रकरणी सहा अभियंत्यांची चूक असताना केवळ चार अभियंत्यांनाच शिक्षा का? हा प्रकार चुकीचा आहे. आयुक्तांनी केला सभागृहाचा अपमान सभागृहात झालेल्या ठरावानुसार आयुक्तांनी कार्यवाही ने केल्यामुळे सभागृहाचा अपमान झाला असल्याचे मत अनंत जोशी यांनी व्यक्त केले आहे. नगरचना विभागातील संचालकांचा प्रताप उघड नगररचना विभागाचे चंद्रकांत निकम यांची पात्रता नसतानाही ते त्या विभागात कार्यरत असल्याचे अनेकदा प्रशासनाचा निदर्शनास आणून दिले होते. तरीही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. ते रजेवर जाण्यापूर्वी दोन दिवसात तब्बल १०० ते १५० फाईल त्यांनी मंजूर केल्या. तसेच रजेवर असतानाही त्यांनी नाशिक येथे नगररचना विभागातील अभियंत्यांना बोलवून स‘ा केल्याचा गौप्यस्फोट अनंत जोशी यांनी केला. या प्रकरणी मनपा प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.