शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘कॉलेजियम’ पद्धतच योग्य; सरन्यायाधीशांचा पाठिंबा

By admin | Updated: September 27, 2014 06:49 IST

न्यायाधीश म्हणून सुमारे २१ वर्षांच्या कारकिर्दीनंतर न्या. लोढा शनिवारी सेवानिवृत्त होत आहेत.

नवी दिल्ली : न्यायाधीशांनीच न्यायाधीशांची निवड करण्याच्या सध्याच्या ‘कॉलेजियम’ पद्धतीचे मावळते सरन्यायाधीश न्या. राजेंद्रमल लोढा यांनी पुन्हा एकदा जोरदार समर्थन केले व याखेरीज अन्य कोणत्याही पद्धतीने न्यायाधीशांची निवड केली गेली तर न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य कदाचित त्यामुळे बाधीत होऊ शकेल, असे मत व्यक्त केले.न्यायाधीश म्हणून सुमारे २१ वर्षांच्या कारकिर्दीनंतर न्या. लोढा शनिवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्याआधी शुक्रवारी न्यायालयीन कामकाजाच्या शेवटच्या दिवशी पत्रकारांशी बोलताना न्या. लोढा म्हणाले की, न्यायाधीशपदावर नियुक्तीसाठी कोणती व्यक्ती योग्य आहे हे न्यायाधीश मंडळीच अधिक चांगल्या प्रकारे जोखू शकतात.न्यायाधीश म्हणून निवड करण्यासाठी विचार करायचा त्या व्यक्तीचे न्यायालयीन कौशल्य, वर्तन, कायद्याचे ज्ञान यासह व्यक्तिमत्वाच्या इतरही अनेक पैलूंचे मूल्यमापन न्यायाधीशच अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात. कारण न्यायाधीश त्या व्यक्तीला न्यायालयात काम कराताना पाहात आलेले असतात, असे आपले व्यक्तिगगत मत असल्याचेही न्या. लोढा म्हणाले. त्यांचे असेही म्हणणे होते की, ज्यात न्यायाधीशांखेरीज वा त्यांच्यासोबत इतर व्यक्ती आहेत, अश निवड पद्धतीने न्यायाधीश निवडले गेले तर कदाचित त्यामुळे न्यायसंस्थेच्या स्वातंत्र्यास बाधा येऊ श्कते, असे मला वाटते. (लोकमत न्यूज नेटवर्क)