शहरं
Join us  
Trending Stories
1
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
2
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
3
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
4
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
5
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
6
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
7
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
8
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
9
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
10
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
11
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
12
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
13
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
14
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
15
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
16
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
17
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
20
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

दाल सरोवरासह काश्मिरातील जलाशय गोठले उत्तर भारतात थंडीची लाट

By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST

श्रीनगर - येथील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले दाल सरोवर व शहरातील अन्य जलाशय गोठले असून, शुक्रवारची रात्र ही या हंगामातील सर्वात थंड रात्र म्हणून नोंदविली गेली. त्या रात्री येथील तापमान उणे ५.६ अंश सेल्सिअस एवढे होते.

श्रीनगर - येथील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले दाल सरोवर व शहरातील अन्य जलाशय गोठले असून, शुक्रवारची रात्र ही या हंगामातील सर्वात थंड रात्र म्हणून नोंदविली गेली. त्या रात्री येथील तापमान उणे ५.६ अंश सेल्सिअस एवढे होते.
थंडीचा कडाका वाढल्याने तापमान १.५ अंशाने घसरून शहराच्या मध्यभागी असलेले दाल सरोवर अंशत: गोठले गेले. या सरोवरात शिकारे चालवून आपले पोट भरणाऱ्या मल्लाहांनी अनेक ठिकाणी बर्फ तोडून आपले शिकारे किनाऱ्यापर्यंत नेले. शहरातील नळांमध्येही पाणी गोठले गेले होते. थंडीमुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असले तरी, दुसरीकडे पर्यटकांना मात्र ही थंडी पर्वणीसारखी वाटत आहे. पहाटेच्या वेळी दाटलेल्या धुक्यामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. लडाख भागातील लेहमध्ये किमान तापमान उणे १६.४ तर कारगीलमध्ये किमान तापमान उणे १४.५ अंश एवढे नोंदवले गेले.

उत्तर प्रदेशात थंडीची लाट कायम
लखनौ - उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासात थंडीची लाट कायम राहिल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. बाराबंकीत धुके व थंडीमुळे पाच जणांचा मृत्यू झाला. येथील गोदरी गावात धुक्यातून जात असलेल्या एका ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दोन तरुण ठार झाले. राजधानी लखनौत सूर्याचे दर्शन झाले नाही व दिवसभर थंडीचा कडाका होता. नागरिकांनी रस्त्याच्या कडेला शेकोट्या पेटवून थंडीपासून स्वत:चे संरक्षण केले.
अलाहाबाद व बरेलीतही थंडीचा कडाका जास्त होता. वाराणसी, कानपूर, आग्रा, गोरखपूर, बरेली येथे तापमान सामान्य स्थितीहून बरेच कमी होते. सर्वात कमी तापमान आग्रा येथे २.८ अंश से. एवढे नोंदवण्यात आले.

बिहारमध्ये थंडीचा कहर
पाटणा-बिहारची राजधानी असलेले पाटणा शहर थंडीच्या लाटेत लपेटले गेले असून येथे कमाल तापमान १५.४ अंश तर किमान ५.६ अंश एवढे नोंदविले गेले आहे. धुक्यामुळे रस्त्यावरची दृष्यता सकाळच्या वेळी ५० मीटरहून कमी झाली होती.
हवामान खात्याचे संचालक ए.के. सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणा शहरालगतच्या ३० कि.मी. च्या परिसरात धुके दाटल्याने तापमानात ९ अंशाने घट झाली. गया येथे सर्वात कमी तापमान, ५.७ अंश एवढे नोंदविले गेले. धुक्यामुळे रस्ते व रेल्वे वाहतूकही विस्कळित झाली. अनेक गाड्या कित्येक तास विलंबाने धावत होत्या. विमान वाहतूकीवरही या वातावरणाचा परिणाम झाला.