नागपूरसह विदर्भात थंडीची लाट

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:41+5:302014-12-18T00:40:41+5:30

नागपूर : उपराजधानीसह विदर्भात थंडीची लाट आली आहे. बुधवारी शहरात ७.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या हिवाळ्यातील हा सर्वाधिक थंडीचा दिवस ठरला.

The cold wave of Nagpur, Vidarbha, along with Nagpur | नागपूरसह विदर्भात थंडीची लाट

नागपूरसह विदर्भात थंडीची लाट

गपूर : उपराजधानीसह विदर्भात थंडीची लाट आली आहे. बुधवारी शहरात ७.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या हिवाळ्यातील हा सर्वाधिक थंडीचा दिवस ठरला.
गेल्या ४८ तासात तापमान १०.९ अंशाने कमी झाले असून, पुढील २४ तासात यात पुन्हा घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उत्तर भारतात सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे विदर्भातील चार जिल्ह्यात ही लाट आली आहे.
गोंदिया येथे बुधवारी सर्वात कमी ७.४ तापमानाची नोंद करण्यात आली. वर्धा येथे ९.५, यवतमाळ ९.६, अकोला व ब्रम्हपुरी येथे प्रत्येकी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: The cold wave of Nagpur, Vidarbha, along with Nagpur