शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या मार्गात येणारे गाय-बैल पकडा; नऊ अभियत्यांवर विचित्र जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 22:58 IST

अभियंत्यांच्या असोसिएशनकडून प्रशासनाचा निषेध

लखनऊ: आपल्या पशूप्रेमामुळे कायम चर्चेत राहणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एका अजब आदेशामुळे चर्चेत आले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या गंगा यात्रेदरम्यान त्यांच्या मार्गात गाय, बैल येऊ नये, याची जबाबदारी सार्वजानिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडे देण्यात आली. उद्या आदित्यनाथ गंगा यात्रेसाठी मिर्झापूरमध्ये येणार आहेत. गंगा यात्रेदरम्यान योगी आदित्यनाथ यांच्या मार्गात गाय, बैल येऊ नयेत, याची जबाबदारी ९ अभियंत्यांवर सोपवण्यात आली. मात्र यावर बरीच टीका झाली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा आदेश तडकाफडकी मागे घेतला. सोमवारी हा आदेश जारी करण्यात आला होता. 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या यात्रेदरम्यान मिर्झापूर ते बिरोही दरम्यान ९ अभियंत्यांची ड्युटी लावण्यात आलेली आहे. या अभियंत्यांनी त्यांना नेमून देण्यात आलेल्या ठिकाणी हजर राहावं,' असं आदेशात नमूद करण्यात आलं होतं. 

प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या या आदेशाबद्दल मिर्झापूरच्या इंजिनीयर असोसिएशननं सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. आमच्या अभियत्यांना पशू पकडण्याचं प्रशिक्षण देण्यात आलेलं नाही. कोणत्याही अभियंत्याला इजा झाल्यास असोसिएशन जबाबदार असणार नाही. त्यामुळे प्रशासनानं हे काम दुसऱ्या विभागाला द्यावं, अशी स्पष्ट भूमिका असोसिएशनकडून घेण्यात आली होती.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथ