शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

नाताळचा सण देशात परंपरागतरीत्या व उत्साहात साजरा

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

नवी दिल्ली-संपूर्ण देशात नाताळचा सण पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवारी मध्यरात्री चर्चमध्ये विशेष प्रार्थना घेण्यात आल्या व आनंदाची गीते गायली गेली.

नवी दिल्ली-संपूर्ण देशात नाताळचा सण पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवारी मध्यरात्री चर्चमध्ये विशेष प्रार्थना घेण्यात आल्या व आनंदाची गीते गायली गेली.
चर्चमध्ये घंटांचा नाद होताच ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये या विशेष प्रार्थनांसाठी पोहचले. ठिकठिकाणी या सणाचा आनंदोत्सव साजरा होत असलेला दिसत होता. ख्रिसमस ट्रीला रंगबिरंगी फितींनी व भेटींनी सजविण्यात आले होते. या सणानिमित्त बाजारपेठेतही बरीच गर्दी होती. लाल रंगाचे कपडे ल्यायलेले व पांढरी दाढी राखलेले सांताक्लॉज मुलांना खाऊ वाटत होते.
अनेक ठिकाणी सामूहिक भोजनाचे आयोजन केले होते तर केक खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये लोकांनी गर्दी केली होती. आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देण्याकरिता नागरिकांनी सोशल नेटवर्किंग साईट्स व वॉट्स अपसारख्या साधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला. कडाक्याच्या थंडीला न जुमानता नागरिक मोठ्या संख्येने प्रार्थनेसाठी बाहेर आले होते. यावेळी शहरात सर्वत्र सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती.