शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:43 IST

Chirag Paswan on Bihar Election : 'पीएम मोदींची दूरदृष्टी आणि नितीश कुमारांच्या अनुभवाने बिहार आणखी गतीने प्रगती करेल.'

Chirag Paswan on Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीएला प्रचंड बहुमत मिळाले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, एनडीए 200 च्या आसपास जागा मिळवताना दिसत आहे. दरम्यान, या ऐतिहासिक विजयावर लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे प्रमुख चिराग पासवान यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली. बिहारच्या मतदारांनी विकासाच्या अजेंड्याला आणि डबल इंजिन सरकारवरील विश्वासाला पुन्हा एकदा अधिक बळ दिल्याचे चिराग म्हणाले.

दरम्यान, या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. भाजपचा 90+ जागांवर विजय होतोय, तर नितीश कुमारांच्या जदयूला 82-83 जागा मिळत आहेत. अशा परिस्थितीत, भाजप नितीश कुमारांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्यास पाठिंबा देईल का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय. या सर्व चर्चेदरम्यान, चिराग पासवान यांनी नितीश कुमारांबद्दल एक महत्वाचे वक्तव्य केले आहे.

नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील

माध्यमांशी संवाद साधताना चिराग पासवान म्हणाले की, "एनडीएला मिळत असलेले जबरदस्त बहुमत हे दाखवते की, बिहार विकासाच्या मार्गावर पुढे जाऊ इच्छिते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा अनुभव या दोन्हीमुळे पुढील पाच वर्षांत बिहार आणखी गतीने प्रगती करेल. बर्‍याच जणांनी दावा केला होता की, एलजेपी (रामविलास) आपली जागा टिकवू शकणार नाही किंवा त्यांना मतदार प्रतिसाद देणार नाही; परंतु मतदारांनी सर्व अंदाज चुकीचे ठरवले."

"यावेळीही मला कोणत्याही सर्वेक्षण किंवा एक्झिट पोलवर नाही, तर स्वतःवर विश्वास होता. स्ट्राइक रेटवर मी अनेक टोमणे मारताना पाहिले आहेत. पण, यंदा युतीचा स्ट्राइक रेट अतिशय सुंदर राहिला आहे. बिहारच्या जनतेने मला कमी लेखण्याची चूक करणाऱ्यांना योग्य उत्तर दिले. या विजयासह नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, मला यावर पूर्ण विश्वास आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आता यावर भाजप काय निर्णय घेतो, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

विरोधकांना धक्का

आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, एनडीए 200 जागा मिळवताना दिसत आहेत. दुसरीकडे, लालू प्रसाद यादव यांचा आरजेडी 25, तर काँग्रेसला फक्त 4 जागांवर समाधान मानावे लागत आहे. इतर पक्षांबद्दल बोलायचे झाले तर, प्रशांत किशोर यांच्या जनसुराज आणि मुकेश सहनी यांच्या व्हीआयपीला शुन्य जागा मिळाल्या आहेत. ओवैसींचा एआयएमआयएम  आणि डाव्यांनी मात्र काही ठिकाणी आघाडी घेतली आहे. येत्या काही वेळात अंतिम निकाल जाहीर होईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nitish Kumar will be CM again, I believe: Chirag Paswan

Web Summary : Chirag Paswan expressed confidence that Nitish Kumar will become Chief Minister again, citing NDA's victory reflecting faith in development. He highlighted BJP's strong performance and dismissed doubts about his party's impact, crediting voters for proving critics wrong.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५chirag paswanचिराग पासवानNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा