शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 08:13 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर या महिन्याच्या अखेरीस जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी सोमवार १८ ऑगस्टला भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी भारत व चीनमधील सीमाप्रश्नावर दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींमधील चर्चेची २४वी फेरी होईल. त्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत वांग यी बोलणी करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) वार्षिक परिषदेसाठी चीनच्या दौऱ्यावर या महिन्याच्या अखेरीस जाणार आहेत. त्याआधी ही घडामोड होत आहे.

भारताच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या निमंत्रणावरून, चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हेही वांग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. डोवाल यांनी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये चीनला भेट दिली होती आणि तेव्हा वांग यांच्यासोबत विशेष प्रतिनिधींची २३वी फेरी पार पडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात रशियातील कझान शहरात दि. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी एक बैठक झाली. दोन्ही देशांतील संवाद पुन्हा सुरू करण्याचा निर्णय त्या बैठकीत झाला.

मोदी जपाननंतर चीनला जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. २९ ऑगस्टला जपान दौऱ्यावर जाणार असून, त्यानंतर ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी चीनमधील तिआनजिन शहरात होणाऱ्या एससीओ परिषदेला उपस्थित राहतील. २ जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पूर्व लडाखमधील लष्करी संघर्ष मे २०२० मध्ये सुरू झाला आणि गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये डेमचोक आणि डेपसांगमधून सैन्य माघारीच्या प्रक्रियेनंतर तो थांबला. दोन्ही देशांनी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यावर सहमती दर्शविली.

भारत आणि चीनमध्ये थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्याच्या शक्यतांवरही चर्चा सुरू आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनीही मागील दोन महिन्यांत एससीओ बैठकीसाठी चीनला भेट दिली. सध्या चीन एससीओचा अध्यक्ष आहे.

चीनने पाकिस्तानला दिली पाणबुडी

चीनने पाकिस्तानला तिसरी प्रगत हँगोर वर्गातील पाणबुडी दिली आहे. अशा आठ पाणबुड्या पाकिस्तानला मिळणार आहेत. हिंद महासागरात पाकिस्तानचेही वर्चस्व निर्माण होण्यासाठी हा निर्णय चीनने घेतल्याचे कळते. सरकारी प्रसारमाध्यम असलेल्या ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, या पाणबुडीचे गुरुवारी चीनच्या वुहान शहरात जलावतरण करण्यात आले. चीनने पाकिस्तानला हँगोरवर्गातील दुसरी पाणबुडी गेल्या मार्च महिन्यात दिली होती.

टॅग्स :chinaचीनAjit Dovalअजित डोवाल