शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

देशाच्या जमिनीवर नव्हे तर सोनिया, राहुल यांच्या मनावर चीनचा कब्जा, भाजपाची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 18:00 IST

लडाखमधील चिनी घुसखोरीवरून काँग्रेसकडून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू असतानात आता भाजपाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना थेट लक्ष्य केले आहे.

ठळक मुद्देभारताने एक इंचसुद्धा जमीन चीनला दिलेली नाहीइंचभर जमीनसुद्धा कुणी आमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाहीचीनने कब्जा केलाच असेल तर तो सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मनावर केला आहे

नवी दिल्ली - भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेला विवाद जैसे थे आहे. मात्र इकडे देशाच्या राजधानीत सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये सीमावादावरून सुरू असलेल्या आरोपप्रत्यारोपात मात्र रोज नववने अंक सादर होत आहेत. काँग्रेसकडून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू असतानात आता भाजपाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना थेट लक्ष्य केले आहे.

काँग्रेसकडून देशाच्या जवानांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहेत. देशाचे लष्करप्रमुख लेहच्या दौऱ्यावर असताना सीडब्ल्यूसीची बैठक घेऊन त्यामध्ये लष्कराच्याविरोधात चर्चा केली जात होती, आता तुम्हाला काय लष्करासोबत लढायचे आहे का, असा सवाल भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.  

काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देताना संबित पात्रा म्हणाले की, भारताने एक इंचसुद्धा जमीन चीनला दिलेली नाही. तसेच इंचभर जमीनसुद्धा कुणी आमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही, मात्र दु:खाची बाब म्हणजे काँग्रेस पक्षाने आपली लाज सरेंडर केली आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनीसुद्धा आपल्या देशाच्या जमिनीवर कुणीही कब्जा केला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

चीनसोबत भारताचा सीमावाद आहे. मात्र आमच्या एक इंच जमिनीवरसुद्धा चीनने कब्जा केलेला नाही. जर चीनने कब्जा केलाच असेल तर तो सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मनावर केला आहे. २००८ मध्ये झालेल्या करारानंतर त्यांच्या डोक्यावर चीनचा कब्जा झाला आहे, अशी आम्हाला भीती वाटते, अशा टोला संबित पात्रा यांनी लगवला.

आपण रोज सकाळी पाहतोय की, काँग्रेस चीन प्रकरणावरून भारताविरोधात आक्रमक होत आहे, तसेच सरेंडर, सरेंडर बोलत आहे, त्यातून त्यांना आत्मशांती का मिळते, असा सवाल पात्रा यांनी उपस्थित केला. दरम्यान, आज सकाळी जेपी नड्डा यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर टीका केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी नड्डा यांच्यावर टीका केली होती.   

इतर महत्त्वाच्या बातम्या 

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

"आमची बांधिलकी जनतेशी, ती मातोश्री ते सिल्व्हर ओक अशा अस्वस्थ येरझाऱ्या घालत नाही"

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

टॅग्स :ladakhलडाखIndiaभारतchinaचीनcongressकाँग्रेसBJPभाजपाSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीSambit Patraसंबित पात्रा