शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

दोन वेण्यांची सक्ती करणे हे बालहक्कांचे उल्लंघन!

By admin | Updated: August 22, 2016 17:17 IST

मुलींनी शाळेत येताना केसांच्या दोन वेण्या घालूनच आले पाहिजे, अशी सक्ती करणे हे विद्यार्थिनींच्या बालहक्कांचे उल्लंघन आहे, असा निकाल केरळ राज्य बालहक्क आयोगाने दिला

विद्यार्थिनींना दिलासा: केरळ बालहक्क आयोगाचा निकालथिरुवनंतपुरम: मुलींनी शाळेत येताना केसांच्या दोन वेण्या घालूनच आले पाहिजे, अशी सक्ती करणे हे विद्यार्थिनींच्या बालहक्कांचे उल्लंघन आहे, असा निकाल केरळ राज्य बालहक्क आयोगाने दिला असून शाळांनी अशी सक्ती करू नये, असा आदेश दिला आहे.कासरगोड जिल्ह्यातील चिमीनी येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयातील मुलीने केलेल्या तक्रारीवर आयोगाच्या अध्यक्षा शोभा कोशी आणि सदस्य के. नासिर व सी.यू. मीना यांनी हा निर्णय दिला. मात्र विद्यार्थिनींनी शाळेत येताना पिंजारलेल्या केसांनी न येता ते व्यवस्थित विंचरून आणि वर एकत्र बांधून यावे, असा नियम शाळा करू शकतात, असे आयोगाने स्पष्ट केले. शाळांनी दोन वेण्यांचा आग्रह करू नये, असा आदेश राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने जारी करावा, असे निर्देश आयोगाने दिले.केरळमधील मुली आठवड्यातून एकदा नव्हे तर दररोज केसावरून आंघोळ करतात, या पार्श्वभूमीवर या विद्यार्थिनीने आयोगाकडे तक्रार केली होती. तिचे म्हणणे असे होते की, सकाळी शाळेत येण्याच्या घाईच्या वेळी केस नीट न वाळवता त्यांच्या घट्ट वेण्या बांधल्या तर केसांना कुबट वास येतो. शिवाय केसांत कोंडा होतो व खाज सुटून डोक्यावर चट्टे उठतात. यावर उपाय म्हणून अनेक मुली आंघोळ न करताच शाळेत येतात.शिवाय मुलांनी केस कसे राखावेत याविषयी कोणताही नियम नसताना फक्त मुलींनाच दोन वेण्या घालून शाळेत येण्याचा आग्रह धरणे हा लिंगभेदी पक्षपात आहे, असेही प्रतिपादन या तक्रारीत करण्यात आले होते.तक्रारदाराशी सहमती दर्शवित आयोगाने म्हटले की, सकाळी लवकर उठून मुलींनी स्वत:चे सर्व आवरायचे, राहिला असेल तर गृहपाठ पूर्ण करायचा आणि या सर्व घाईगर्दीत वेण्याही घालायच्या हे खूपच अडचणीचे आहे. शिवाय हल्ली बहुतांश आयाही नोकरी करीत असल्याने सकाळच्या वेळी त्यांचीही घाई असते, त्यामुळे त्यांनाही मुलीच्या वेण्या घालून देणे शक्य होईलच असे नाही. अशा परिस्थितीत शाळांनी दोन वेण्यांचा आग्रह धरणे हे विद्यार्थिनींच्या शारीरिक आणि मानसिक तणावात भर टाकणारे असल्याने हे त्यांच्या बालहक्कांचे उल्लंघन आहे.कासरगोड जिल्हा बाल सुरक्षा अधिकारी के. बाबू यांनी या तक्रारदार मुलीच्या शाळेत जाऊन चौकशी केला असता बहुसंख्य विद्यार्थिनींचा दोन वेण्यांच्या सक्तीला विरोध असल्याचे दिसले होते. त्यांनी तसा अहवाल आयोगास दिला होता.केस लांबसडक असतील तर व्यवस्थित वेणी घालता येते व ती दिवसभर न सुटता चांगली घट्ट राहते. आखूड केसांच्या दोन वेण्या घातल्या तर त्या शेंडीसारख्या दिसतात व त्यामुळे आपण ‘ध्यान’ दिसतो याचे मुलींच्या मनावर कायम दडपण येते, असेके. नासिर, सदस्य, केरळ बालहक्क आयोग यांनी सांगितले.