विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून चव्हाण यांची निवड

By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:08+5:302015-08-18T21:37:08+5:30

क रमाळा :

Chavan's selection as a university representative | विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून चव्हाण यांची निवड

विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून चव्हाण यांची निवड

रमाळा :
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यापीठ प्रतिनिधी पदाच्या निवडणुकीत केतन दिलीप चव्हाण विजयी झाला आहे.
आज येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विद्यापीठ प्रतिनिधी पदाची निवडणूक घेण्यात आली़ या निवडणुकीत विद्यापीठ प्रतिनिधी पदासाठी केतन चव्हाण,अस्मिता घोलप,ऐश्वर्या भणगे या तिघा वर्ग प्रतिनिधींनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मतदान घेण्यात येऊन केतन चव्हाण यास ७ मते तर अस्मिता घोलप हिला ३ मते व ऐश्वर्या भणगे हिला २ मते मिळाली़ केतन चव्हाण हा ४ मताने विजयी झाला. विजयानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.
केतन चव्हाण हा श्रीदेवीचामाळ येथील रहिवासी असून, तो यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बी.ए भाग-२ मध्ये शिक्षण घेत आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे हे ५० वे वर्ष असून, यंदा विविध कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयात करण्यात येणार आहे. केतन चव्हाण याच्या निवडीबद्दल विद्याविकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे,प्राचार्य मीरा रामनवमीवाले,मकाई सह़साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी सत्कार व अभिनंदन केले. वार्ताहर

टिप: केतन चव्हाण यांचा सिंगल फोटो व सत्कार फोटो मेल केले आहेत. दोन्ही पैकी एक घ्यावा.

Web Title: Chavan's selection as a university representative