शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटना बदलणे ही आत्महत्या

By admin | Updated: November 28, 2015 02:38 IST

राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी भाषा म्हणजे केवळ संभ्रम निर्माण करण्यासारखे आहे. तसे करणे म्हणजे आत्महत्या ठरेल. ‘इंडिया फर्स्ट’ हाच सरकारचा धर्म आहे

नवी दिल्ली : राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी भाषा म्हणजे केवळ संभ्रम निर्माण करण्यासारखे आहे. तसे करणे म्हणजे आत्महत्या ठरेल. ‘इंडिया फर्स्ट’ हाच सरकारचा धर्म आहे. भारताचे संविधान हाच सरकारचा एकमेव धर्मग्रंथ आहे, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५वे जयंती वर्ष आणि संविधान दिन याचे निमित्त साधून आयोजित ‘राज्यघटनेसंबंधी कटिबद्धता’ या विषयावरील विशेष चर्चेच्या उत्तरात मोदी म्हणाले की, घटनाकारांनी देश चालविण्यासाठी जो कायदा आणला त्यामुळेच देशाला बळ मिळाले आहे. राज्यघटनेतील निहित मूल्यांमुळेच भारत केवळ सशक्त नव्हे तर जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी देश बनला आहे. संविधानाची ही शक्ती देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविली जावी, असे आवाहन त्यांनी केले. सर्व पंथ समभाव ही ‘आयडिया आॅफ इंडिया’ असून देश संविधानानुसार चालत आला आहे. यापुढेही तो चालत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यघटना बदलण्याचा विचार केला जात आहे असा संभ्रम निर्माण केला जात आहे. त्याबद्दल कुणी विचारही करू शकत नाही. भारतात १२ धर्म, १२२ भाषा आणि १६०० पेक्षा जास्त बोलीभाषा आहेत. एवढे वैविध्य असलेल्या भारतासारख्या देशासाठी सशक्त राज्यघटनेची निर्मिती करणे हे सोपे काम नव्हते. दोन दिवस या महान कार्याची प्रशंसा आणि संविधानाबद्दल आस्था व्यक्त करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मी आपली भावना व्यक्त करीत आहे. घटनाकारांनी गौरवशाली संविधानाची निर्मिती केली आहे. त्यानंतर गरीब, मजूर, शेतकरी, शिक्षक आणि असंख्य घटकांनी तसेच देशाचे सर्व सरकार आणि पंतप्रधानांनी देशाला समोर नेले आहे. त्यांचे योगदान इच्छा असूनही कुणी नाकारू शकणार नाही. एका साधनेतून देशाला मजबुती लाभली आहे. आपले संविधान देशवासीयांना सन्मान देत असून देशाच्या ऐक्याला बळकटी देते. दरवर्षी संविधान दिवस साजरा करण्याच्या दिशेने विचार केला जात आहे. संविधानाची चर्चा लोकसभेपासून जनसभेपर्यंत पोहोचली जावी. त्यावर निरंतर मंथन केले जावे यासाठी आम्ही प्रयत्न सुरू ठेवायला हवे. ही शक्ती अधिकाधिक लोकांना समजायला हवी. देशाच्या राज्यघटनेबद्दल सर्वांपर्यंत माहिती पोहोचली जावी यासाठी आॅनलाईन स्पर्धा आयोजित केल्या जाऊ शकतात. २६ जानेवारी रोजी राज्यघटना लागू करण्यात आली. हा दिवस अतिशय उत्साहात साजरा केला जातो. ती परंपरा बनली आहे; मात्र या दिवसाची ताकद २६ नोव्हेंबर या दिवसांत दडली आहे. त्या दिवशी देशाने घटनेचा स्वीकार केला होता. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.——————मोदी म्हणाले...>सर्व समाजघटक आणि धर्मातील लोकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध.>बहुमताच्या आधारावर निर्णय लादले जाणार नाहीत. सहमतीच्या राजकारणावर विश्वास.>राज्यघटनेत बदल घडवून आणला जाणार नाही, ती शक्यताही नाही.>जवाहरलाल नेहरूंसारख्या थोर नेत्यांचे योगदान कमी लेखण्याचा प्रयत्न नाही, त्यांना विनम्र आदरांजली..विविधता हीच भारताची शक्ती. तिचे पोषण केले जावे. असहिष्णुतेसंबंधी हल्ल्यांना प्रत्युत्तर.>यापूर्वीच्या सरकारांचे योगदान नाकारता येत नाही. देशाला पुढे नेण्यात सर्व घटकांचा सहभाग.डॉ. बाबासाहेबांनी आयुष्यभर अडचणी, यातना आणि अपमान सहन केला; मात्र त्यांच्या मनात बदल्याची भावना कधीही आली नाही. त्यांनी सर्वांना जोडण्याचा आणि सामावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हलाहल पिऊन अमृत मागे ठेवले हीच त्यांची महानता आहे, या शब्दांत मोदींनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. कॉलेजियम आणि न्यायिक नियुक्ती आयोग कायद्याच्या वादाचा थेट उल्लेख टाळत ते म्हणाले की, वादाच्या काळात राज्यघटना हीच आधारभूत दस्तऐवज आहे. लोकशाहीच्या तिन्ही स्तभांना मर्यादा पाळायच्या आहेत, हाच राज्यघटनेचा उद्देश आहे.राज्यघटनेत ४२वी दुरुस्ती करताना ‘सेक्युलर’ हा शब्द जोडण्यात आल्याबद्दल गृहमंत्री राजनाथसिंह यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सेक्युलर या शब्दाचा सर्वाधिक राजकीय दुरुपयोग होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. मोदींनी धर्मनिरपेक्षता किंवा सेक्युलर या शब्दाबद्दल थेट भाष्य टाळले.