चंद्रकांत ढाकुलकर यांना पत्रकारिता पुरस्कार

By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30

नागपूर : विदर्भ साहित्य संघातर्फे प्रदान करण्यात येणारा हरिकिसन अग्रवाल स्मृती पत्रकारिता पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत ढाकुलकर यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यांचा नाट्यक्षेत्राशी जवळचा संबंध आहे. अभिनय आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात त्यांचा अनुभव आहे. ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात १४ जानेवारी रोजी त्यांना हा सन्मान प्रदान केला जाईल.

Chandrakant Dhakkalan received the journalism award | चंद्रकांत ढाकुलकर यांना पत्रकारिता पुरस्कार

चंद्रकांत ढाकुलकर यांना पत्रकारिता पुरस्कार

गपूर : विदर्भ साहित्य संघातर्फे प्रदान करण्यात येणारा हरिकिसन अग्रवाल स्मृती पत्रकारिता पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत ढाकुलकर यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यांचा नाट्यक्षेत्राशी जवळचा संबंध आहे. अभिनय आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात त्यांचा अनुभव आहे. ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात १४ जानेवारी रोजी त्यांना हा सन्मान प्रदान केला जाईल.

Web Title: Chandrakant Dhakkalan received the journalism award