शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान

By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST

निवडणूक अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान

निवडणूक अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान
औरंगाबाद : धनंजय आणि पंडितअण्णा मुंडे न्यायालयात
औरंगाबाद : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दाखल केलेला उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या वेगवेगळ्या याचिका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि त्यांचे वडील पंडितअण्णा मुंडे यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केल्या आहेत. या प्रकरणी न्यायालयाने सोमवारी प्रतिवादी ग्रामविकासमंत्री पंकजा पालवे यांच्यासह प्रतिवादींना नोटिसा काढून याचिकेची सुनावणी १५ एप्रिल रोजी ठेवली आहे.
बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार कारखान्याचे सभासद धनंजय मुंडे आणि पंडितअण्णा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. छाननीत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दोन्ही पिता-पुत्र संचालक असलेल्या जगत्मित्र सहकारी सूतगिरणीकडे जिल्हा बँकेची थकबाकी असल्याचे कारण देत त्यांचे अर्ज रद्द केले. त्यावेळी याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला. मात्र, त्यांचे आक्षेप मान्य करण्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात विभागीय सहनिबंधकां (सहकारी संस्था)कडे अपील दाखल केले. विभागीय सहनिबंधकांनी उभयतांचे अपील फेटाळून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचा निर्णय कायम ठेवला. आ. मुंडे आणि पंडितअण्णा यांनी ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात स्वतंत्र याचिका दाखल केल्या. याचिकेत न्यायालयाने प्रतिवादी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, यशस्विनी मुंडे, निवडणूक निर्णय अधिकारी आदी प्रतिवादींना नोटिसा काढण्याचे आदेश देऊन याचिकेची सुनावणी १५ एप्रिल रोजी ठेवली.
एफआयआर रद्द करण्याची याचिका मागे
जगत्मित्र सहकारी सूतगिरणीतील कथित १२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी दाखल एफआयआर रद्द करावा, अशी विनंती करणारी याचिका सोमवारी याचिकाकर्ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे आणि त्यांचे वडील पंडितअण्णा मुंडे या संचालकांनी न्यायालयातून मागे घेतली.
टोकीवाडी (ता. परळी, जि. बीड) येथील जगत्मित्र सहकारी सूतगिरणीने २००३ पासून कापूस उत्पादकांना कापसाचे पैसे देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे सूतगिरणीची मालमत्ता शिखर बँकेकडे गहाण आहे. असे असताना कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता जिल्हा बँक दरवर्षी कर्ज देत राहिली. २०१२ पर्यंत सूतगिरणीला १२ कोटी रुपये कर्ज देण्यात आले. बँकेने दिलेल्या कर्जाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी बँक मॅनेजर शेख शमीम अकबर यांनी २ ऑक्टोबर २०१३ रोजी दिलेल्या तक्रारीवरून धनंजय मुंडे, पंडितअण्णा मुंडे यांच्यासह १७ संचालकांविरोधात भादंवि ४२०, ४०६ आणि ३४ या कलमांनुसार गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करावा, यासाठी आ. धनंजय मुंडे आणि पंडितअण्णा मुंडे यांनी खंडपीठात धाव घेतली आहे. ही याचिका सोमवारी न्यायालयासमोर आली असता याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या परवानगीने याचिका मागे घेतली. आ. धनंजय मुंडे यांच्याकडून ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे काम पाहत आहेत.