शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी वकिलाचा आरोप केंद्राने फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2015 23:29 IST

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींविषयी ‘सौम्य’ भूमिका घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आल्याचा तत्कालीन विशेष सरकारी वकील रोहिणी

नवी दिल्ली : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींविषयी ‘सौम्य’ भूमिका घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आल्याचा तत्कालीन विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी केलेला आरोप केंद्र सरकार आणि राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी सर्वोच्च न्यायालयात फेटाळून लावला.‘सरकारी वकिलाला आरोपींबाबत सौम्य भूमिका घेण्यास सांगण्यात आल्याचा मुख्य आरोप आहे. मी स्वत: याबाबतची कागदपत्रे तपासली आहेत. या आरोपात काहीही तथ्य नाही,’ असे केंद्रीय गृहमंत्रालय आणि एनआयएच्या वतीने युक्तिवाद करणारे अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले.आरोपींबाबत सौम्य भूमिका घेण्यासाठी सरकारकडून सालियन यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप एका जनहित याचिकेत करण्यात आला आहे. या जनहित याचिकेवर सरकार आणि एनआयएच्या वतीने प्रति-प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास एक आठवड्याची मुदत देण्याची विनंती रोहतगी यांनी यावेळी केला. गेल्या ११ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने या जनहित याचिकेवरून केंद्र व एनआयएला नोटीस बजावून उत्तर सादर करण्यास सांगितले होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)सामाजिक कार्यकर्ते हर्ष मांदेर यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. आरोपींविषयी सौम्य भूमिका घेण्यासाठी विशेष सरकारी वकिलावर दबाव टाकून केंद्र व एनआयए सरकारी वकिलाच्या कामकाजात हस्तक्षेप करीत आहेत. एकप्रकारे कार्यपालिका ही न्यायपालिकेवर प्रभाव टाकत आहे, असा आरोप या याचिकेत केला आहे. या आरोपानंतर सालियन यांना एनआयएने आपल्या विशेष सरकारी वकिलाच्या पॅनलमधून वगळले होते. या मालेगाव बॉम्बस्फोटात लेफ्टनंट कर्नल एस. पी. पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हे प्रमुख आरोपी आहेत. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या मशिदीत झालेल्या या बॉम्बस्फोटात ४ जण ठार आणि ७९ जखमी झाले होते. (वृत्तसंस्था)