शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआय संचालक सिन्हांची नाचक्की!

By admin | Updated: November 21, 2014 02:55 IST

२-जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्याशी संबंधित प्रकरणांचा तपास व अभियोग यातून केंद्रीय गुप्तचर विभागाचे (सीबीआय) संचालक रणजीत सिन्हा यांना दूर ठेवण्याचा अभूतपूर्व आदेश

हरीश गुप्ता, नवी दिल्ली२-जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्याशी संबंधित प्रकरणांचा तपास व अभियोग यातून केंद्रीय गुप्तचर विभागाचे (सीबीआय) संचालक रणजीत सिन्हा यांना दूर ठेवण्याचा अभूतपूर्व आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. ‘सीबीआय’च्या ५१ वर्षांच्या इतिहासात त्यांच्या संचालकांची अशी नाचक्की होण्याची ही पहिलीच वेळ आहे.रणजीत सिन्हा यांच्या सरकारी निवासस्थानी त्यांना भेटायला येणाऱ्या अभ्यागतांची यादी पाहता त्यांनी २-जी घोटाळ्यातील काही आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केला असावा, या ‘सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन’च्या जनहित याचिकेतील आरोपांमध्ये आम्हाला सकृतदर्शनीतरी तथ्य दिसते, असे भाष्य सरन्यायाधीश न्या. एच.एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केले. मात्र सीबीआयवरील जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ नये याशी सविस्तर कारणमीमांसा न करता खंडपीठाने ‘सीबीआय संचालकांनी २-जी तपासातून स्वत:हून दूर राहावे’, एवढाच लेखी आदेश दिला. रणजित सिन्हा दूर राहिल्यावर त्यांच्यानंतरच्या ज्येष्ठतम अधिकाऱ्याने या तपासाचे पर्यवेक्षण करावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे आता सीबीआयचे विशेष संचालक अनिल सिन्हा यांच्या देखरेखीखाली हा तपास सुरु राहील. रणजित सिन्हा २ डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्याआधी जेमतेम आठवडाभर आधी न्यायालयाने अशा तऱ्हेने फटकारल्याने त्यांच्यावर तोंड लपविण्याची पाळी यावी याने सीबीआयमधील संपूर्ण अधिकारीवर्ग हादरला आहे. सीबीआय ज्यांच्या थेट नियंत्रणाखाली काम करते त्या पंतप्रधान कार्यालयाने व कार्मिक विभागाने कोणतेही भाष्य करायचे टाळले. मात्र ज्या संस्थेचे प्रमुखपद गेली तीन वर्षे भूषविले तिची प्रतिष्ठा जपण्यासाठी तरी रणजित सिन्हा यांनी लगेच राजीनामा द्यावा, असे मत सीबीआयच्या अनेक माजी संचालकांनी व्यक्त केले. डी. आर. कार्तिकेयन, जोगिंदर सिंग व आर. के. राघवन या तीन माजी संचालकांचे,यांनी अशा परिस्थितीत सिन्हा यांनी पदावर राहणे योग्य नाही, असे मत होते.