शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कावेरी पाणी वाटपामुळे 'तिच्या' लग्नावर संकट

By admin | Updated: September 13, 2016 13:39 IST

अपवादात्मक परिस्थितीत एखादी कौटुंबिक दुर्घटना किंवा कायदा-सुव्यवस्थेमुळे विवाह सोहळयाच्या उत्साहावर विरजण पडते. बंगळुरुमध्ये रहाणा-या प्रेमालाही सध्या अशाच अनुभवातून जावे लागत आहे.

ऑनलाइन लोकमत 

बंगळुरु, दि. १३ - विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो पण अपवादात्मक परिस्थितीत एखादी कौटुंबिक दुर्घटना किंवा कायदा-सुव्यवस्थेमुळे विवाह सोहळयाच्या उत्साहावर विरजण पडते. बंगळुरुमध्ये रहाणा-या प्रेमालाही सध्या अशाच अनुभवातून जावे लागत आहे. 
 
कावेरी पाणी वाटपावरुन कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारामुळे प्रेमाला मंगळवारी बंगळुरुमध्ये वाहनाच्या शोधात अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागली. प्रेमाचा तामिळनाडूतील युवकाशी बुधवारी विवाह होणार आहे. 
 
नववधूच्या वेशात नटलेली प्रेमा आणि तिचे कुटुंबिय विवाहस्थळी पोहोचण्यासाठी वाहनाच्या शोधात फिरत होते. बंगळुरुमध्ये सोमवारी अनेक बसेस पेटवून देण्यात आल्या. त्यामुळे बससेवा पूर्णपणे बंद असून, कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यात परस्परांच्या वाहनांना तूर्तास प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 
 
प्रेमाचे विवाहस्थळ तामिळनाडूमध्ये आहे. त्यामुळे प्रेमा आणि तिच्या कुटुंबाला कावेरी पाणी वाटप प्रश्नाचा सर्वाधिक फटका बसला आहे. आमचा आनंद हरवला असून, आम्ही हा दिवस कधी विसरु शकत नाही अशी प्रतिक्रिया प्रेमाच्या कुटुंबियांनी दिली. आम्ही ६०० जणांना लग्नाचे निमंत्रण दिले होते पण आता लग्नाला फक्त २० जणच उपस्थित रहाणार आहेत  असे निराश झालेल्या प्रेमाने सांगितले.