शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

जात वैधता समितीला खडसावले

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

हायकोर्ट : वारंवार समजावूनही आदेशाची अवमानना

हायकोर्ट : वारंवार समजावूनही आदेशाची अवमानना

नागपूर : एखाद्याला जात वैधता प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याच्या रक्ताच्या नात्यातील दुसऱ्या व्यक्तीचा समान जात वैधतेचा दावा नाकारला जाऊ शकत नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही जात वैधता पडताळणी समितीचे अधिकारी बिनडोकपणे वागून एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना वेगवेगळे निकष लावत आहेत. अकोला विभागीय जात वैधता पडताळणी समितीला याचा जोरदार फटका बसला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समितीचे अध्यक्ष व सदस्यांना व्यक्तिश: बोलावून कडक शब्दांत खडसावले.
समिती अध्यक्ष एच.पी. तुमोड व सदस्य भीमराव खंडाते न्यायालयात उपस्थित झाले होते. दुसऱ्या सदस्य प्राजक्ता इंगळे रुग्णालयात भरती असल्यामुळे येऊ शकल्या नाहीत. एखाद्याने बनावट दस्तावेजाच्या आधारे मिळविलेले वैधता प्रमाणपत्र नाकारले जाऊ शकते, पण वैध प्रमाणपत्राचा उचित सन्मान झाला पाहिजे. परंतु, समिती विवेकबुद्धीला वेशीबाहेर सोडून मुलाला वैधता प्रमाणपत्र देताना वडिलाच्या वैधता प्रमाणपत्राकडे दुर्लक्ष करीत आहे. हा सामान्य व्यक्तींचा मानसिक छळ करण्याचा प्रकार आहे. अधिकार व कर्तव्य हातात हात टाकून चालायला हवे हे कोणीच विसरू नये, असे मत न्यायालयाने समितीला फटकारताना नोंदविले. समिती पदाधिकाऱ्यांनी न्यायालयासमक्ष प्रतिज्ञापत्र सादर करून बिनशर्त क्षमा मागितली. तसेच, यापुढे अशी चूक करणार नाही अशी ग्वाही दिली. यामुळे न्यायालयाने अधिकाऱ्यांना क्षमा करून सरकारी वकिलाला या आदेशाची प्रत सर्व जात वैधता पडताळणी समितींकडे पाठविण्याची सूचना केली.
अकोला समितीने राजपूत भामटा (विमुक्त जाती) जातीचा दावा फेटाळल्यामुळे बुलडाणा येथील आशिष सोळंकी, सिद्धेश्वर मोरे व प्राजक्ता गायकवाड यांनी उच्च न्यायालयात वेगवेगळ्या रिट याचिका दाखल केल्या होत्या. मोरे यांच्या चुलत भावाला, गायकवाड यांच्या वडिलाला, तर सोळंकी यांच्या सख्ख्या बहिणीला जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले आहे. परंतु, या तिघांना वैधता प्रमाणपत्र नाकारण्यात आले होते. यामुळे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दोन आठवड्यांत वैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देतानाच समितीला समन्स बजावला होता. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. एन. बी. काळवाघे यांनी बाजू मांडली.