सीबीआय बंद करणार बिर्ला, पारख यांचे प्रकरण

By Admin | Updated: August 22, 2014 01:16 IST2014-08-22T01:16:55+5:302014-08-22T01:16:55+5:30

उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव पी.सी. पारख यांच्या विरोधातील प्रकरणाचा ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Case against Birla and Parakh | सीबीआय बंद करणार बिर्ला, पारख यांचे प्रकरण

सीबीआय बंद करणार बिर्ला, पारख यांचे प्रकरण

नवी दिल्ली : दहा महिन्यांच्या तपासानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने कोळसा खाणपट्टे वाटप प्रकरणात उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव पी.सी. पारख यांच्या विरोधातील प्रकरणाचा ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीआयला या प्रकरणात कोणताही पुरावा मिळू शकलेला नाही. सीबीआयने या दोघांविरुद्ध गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रकरण दाखल केले होते. 
पारख यांनी कोणतेही वैध कारण किंवा परिस्थितीमधील बदलाशिवाय आणि अयोग्य बाजू घेऊन काही महिन्यातच हिंदाल्कोच्या कोळसा खाणपट्टा वाटपाचा निर्णय फिरवला, असा आरोप सीबीआयचा होता. हा एफआयआर 2क्क्5 मध्ये तालाबीरा-2 आणि 3 कोळसा खाणपट्टे वाटपासंबंधित होता. सीबीआयने आयपीसीच्या विविध कलमांर्तगत बिर्ला आणि पारख व हिंदाल्कोच्या इतर अधिका:यांविरुद्ध आरोप केले होते. सीबीआयला तपासादरम्यान पारख यांनी एखाद्या वस्तूच्या मोबदल्यात अयोग्य बाजू घेतली नाही आणि हिंदाल्कोच्या कोळसा खाणपट्टा वाटपात गडबड झालेली नसल्याचे दिसून आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: Case against Birla and Parakh