शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यावरून कर्नाटक पेटले

By admin | Updated: September 10, 2016 04:01 IST

कन्नडसमर्थक संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदमुळे राजधानी बंगळुरूसह राज्याच्या जवळपास सर्व भागातील जनजीवन शुक्रवारी विस्कळीत झाले.

बंगळुरू : कावेरीचे पाणी तामिळनाडूला सोडण्याच्या निषेधार्थ कन्नडसमर्थक संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदमुळे राजधानी बंगळुरूसह राज्याच्या जवळपास सर्व भागातील जनजीवन शुक्रवारी विस्कळीत झाले. तामिळनाडूसाठी कावेरी नदीचे पाणी सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. कन्नडसमर्थक संघटनांनी या निषेधार्थ लाक्षणिक बंदची हाक दिली होती. केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्गमन टर्मिनल व रेल्वेस्थानकात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या या संघटनांच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बंदमुळे परिवहन महामंडळाची बससेवा बंदच होती. आॅटोरिक्षा आणि टॅक्सी रस्त्यावरून गायब होत्या. बंगळुरूतील मेट्रो सेवाही बंद ठेवण्यात आली होती. यामुळे विविध ठिकाणांहून बंगळुरूला येणाऱ्या आणि विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. (वृत्तसंस्था)>...तर प्रतिकूल परिणाम होईलकावेरीचे पाणी तामिळनाडूला सोडण्याच्या निर्णयामुळे कर्नाटकात आक्रोश निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी केली. कोंडी फोडण्यासाठी पंतप्रधानांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची तातडीने बैठक घ्यावी, असेही ते म्हणाले. अशांतता राहिल्यास राज्याची अर्थव्यवस्था आणि माहिती तंत्रज्ञान उद्योग क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होईल, असे सिद्धरामय्या यांनी मोदींना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. >रस्तारोको; पाण्यात उतरून निषेधकर्नाटक केबल आॅपरेटर असोसिएशननेही बंदचे समर्थन केले. असोसिएशनने तामिळ टीव्ही वाहिन्यांचे प्रसारण न करण्याची घोषणा केली. चित्रपटगृहांतही तामिळ चित्रपट न दाखवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंड्या, म्हैसूर, बेल्लारी, कोप्पाला, चिक्काबल्लापुरा, धारवाड आणि कोलार येथेही बंदचा परिणाम दिसून आला. कावेरी निदर्शनांचा केंद्रबिंदू असलेल्या मंड्या येथे निदर्शकांनी बंगळुरू - म्हैसूर महामार्गावर अनेक ठिकाणी ठिय्या मारला. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी डोक्यावर धोंडे घेऊन नदीच्या पाण्यात निषेध केला. बेल्लारीत तामिळनाडूच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली.