भिंत अंगावर पडल्याने शाळकरी मुलाचा करुण अंत

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:41+5:302014-12-18T00:40:41+5:30

नागपूर : भिंत पडून मलब्यात दबलेल्या एका शाळकरी बालकाचा करुण अंत झाला. शेख रेहान शेख इरशाद (वय ९) असे मृत बालकाचे नाव आहे. तो महापालिकेच्या हिंदी शाळेचा चौथीचा विद्यार्थी होता.

Caring End of the Boyfriend After Falling The Wall | भिंत अंगावर पडल्याने शाळकरी मुलाचा करुण अंत

भिंत अंगावर पडल्याने शाळकरी मुलाचा करुण अंत

गपूर : भिंत पडून मलब्यात दबलेल्या एका शाळकरी बालकाचा करुण अंत झाला. शेख रेहान शेख इरशाद (वय ९) असे मृत बालकाचे नाव आहे. तो महापालिकेच्या हिंदी शाळेचा चौथीचा विद्यार्थी होता.
जरीपटक्यातील कपिलनगरात ही शाळा आहे. दुपारी १२.३० वाजता जेवणाची सुटी झाल्यामुळे रेहान आपल्या वर्गमित्रांसोबत मैदानात खेळत होता. बाजूला उद्यान आहे. मैदान आणि उद्यानाच्या मध्ये एक जुनी भिंत आहे. अचानक ही भिंत कोसळली. त्यामुळे रेहान मलब्यात दबला. ते पाहून त्याचे वर्गमित्र आरडाओरड करीत पळून गेले. शिक्षकांनी लगेच अग्निशमन दलाला पाचारण केले. रेहानला मलब्यातून काढून मेयोत नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे शाळा आणि परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.
---

Web Title: Caring End of the Boyfriend After Falling The Wall