शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव मोटारीने ठोकरले, दोन ठार, तीन जखमी

By admin | Updated: January 20, 2015 00:25 IST

पिंपळे गुरव : सहा महिन्यांच्या चिमुरडीचा मृतांत समावेश, आई-आजी गंभीर

पिंपळे गुरव : सहा महिन्यांच्या चिमुरडीचा मृतांत समावेश, आई-आजी गंभीर

रहाटणी : रात्री सव्वा-साडेनऊची वेळ... पिंपळे गुरवकडून पिंपळे सौदागरला जाणारा रस्ता..., जगताप पेट्रोलपंपाच्या दिशेने एक पांढर्‍या रंगाची इंडिका कार वायूवेगाने आली आणि काही समजण्याच्या आत तिने तीन महिलांसह दोन वाहनांना धडक दिली. या अपघातात दोन जण ठार झाले असून, २ जण गंभीर, तर एक जण किरकोळ जखमी आहे. कारमधील एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दुसरा पळून गेला आहे. कारचालक दारू पिऊन वाहन चालवित होता, असे पोलिसांनी सांगितले.
मृतांमध्ये दुचाकीस्वार रमाकांत दिघे (वय ४५, रा. बळीराज कॉलनी, रहाटणी), स्वरा संदीप सुर्वे (वय ६ महिने ) यांचा समावेश आहे, तर गंभीर जखमींमध्ये मुलीची आई सविता संदीप सुर्वे, आजी सुनंदा विठ्ठल सुर्वे, रिक्षाचालक चंद्रकांत धोंडिबा झिरंग (वय ४५, रा. नवी सांगवी) यांचा जखमींमध्ये समावेश आहे.
पिंपळे गुरवमधील जगताप पेट्रोलपंपाकडून येणारा रस्ता पिंपळे सौदागर ते नाशिक फाटा या ४५ मीटर रस्त्याला जोडला आहे. रात्री सव्वानऊच्या सुमारास एक इंडिका मोटार (एमएच १४ बीए ३८२९) पिंपळे गुरवकडून भरधाव वेगाने पंचेचाळीस मीटर रस्त्याच्या दिशेने निघाली. सुरूवातीला पेट्रालपंपाजवळ रस्त्यावरून चालणार्‍या तीन जणांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर न थांबता ती मोटार आणखी जोरात निघाली. तेथूनच काही अंतरावर असणार्‍या दुचाकीला (एमएच १२ डीपी ७७५६) जोरदार ठोकर देऊन पुढे एका रिक्षाला (एमएच एससी ५२३) जोरदार धडक दिली. त्यापुढे जाऊन ती मोटार सोडून देऊन त्यांतील एक जण पळून गेला. तर एक जण पोलिसांच्या हाती लागला आहे. ही घटना घडताच पंधराच मिनिटतिं सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल केले.