शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

मनमोहनसिंग यांना न्यायालयात बोलवा

By admin | Updated: September 21, 2015 23:27 IST

तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यालयाने प्रकरणाची तपासणी आणि पुनर्तपासणी केल्यानंतरच जिंदल समूहाला कोळसा खाणपट्टा वाटप करण्याचा निर्णय घेतला होता

नवी दिल्ली : तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यालयाने प्रकरणाची तपासणी आणि पुनर्तपासणी केल्यानंतरच जिंदल समूहाला कोळसा खाणपट्टा वाटप करण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव यांनी सोमवारी विशेष न्यायालयात केला. डॉ. मनमोहनसिंग यांना अतिरिक्त आरोपी म्हणून न्यायालयात बोलावण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेला आपला पाठिंबा आहे, असे राव यावेळी म्हणाले.कोळसा खाणपट्टे वाटप प्रकरणात अतिरिक्त आरोपी म्हणून मनमोहनसिंग यांच्यासह अन्य दोघांनाही न्यायालयात बोलावण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांनी दाखल केली आहे. ‘झारखंडमधील मुर्गादंगल कोळसा खाणपट्टा नवीन जिंदल समूहाच्या कंपनीला वाटप करण्यात आला होता आणि त्यावेळी कोळसामंत्री असलेले मनमोहनसिंग यांनीच हा निर्णय घेतला होता’, असे या मागणीला पाठिंबा देताना राव यांच्या वकिलाने विशेष सीबीआय न्यायालयात सांगितले. ‘मी कोडा यांच्या मागणीचे समर्थन करीत आहे,’ असे राव यांच्या वतीने त्यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयात सांगितले. तथापि या मागणीला आपला पाठिंबाही नाही आणि त्याचा विरोधही करीत नाही, असे उद्योगपती नवीन जिंदल यांची वकील एस.व्ही. राजू म्हणाले. या प्रकरणातील १५ आरोपींमध्ये कोडा यांचाही समावेश आहे. मनमोहनसिंग यांच्यासह तत्कालीन ऊर्जा सचिव आनंद स्वरूप आणि तत्कालीन खाण सचिव जयशंकर तिवारी यांनाही अतिरिक्त आरोपी म्हणून समन्स बजावण्याची मागणी कोडा यांनी केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)