शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन तरुणाच्या मदतीने केली घरफोडी

By admin | Updated: August 20, 2016 22:22 IST

जळगाव - आसोदा रस्त्यावरील मोहन टॉकीजच्या मागे राहणार्‍या नारायण देवराम सोनार यांच्याकडे घरफोडी करणार्‍या ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर (वय ३५) व हितेंद्र शिवाजी परदेशी (वय २३) दोन्ही रा.कांचन नगर यांना शनी पेठ पोलिसांनी शनिवारी सकाळी जेरबंद केले. यातील बाविस्कर हा सराईत गुन्हेगार आहे तर परदेशी हा मुक्त विद्यापीठात बी.कॉमच्या दुसर्‍या वर्षाचे शिक्षण घेत आहे.सध्या तो सेल्समनचे काम करतो. त्याच्या मदतीने बाविस्करने घरफोडी केली होती.

जळगाव - आसोदा रस्त्यावरील मोहन टॉकीजच्या मागे राहणार्‍या नारायण देवराम सोनार यांच्याकडे घरफोडी करणार्‍या ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर (वय ३५) व हितेंद्र शिवाजी परदेशी (वय २३) दोन्ही रा.कांचन नगर यांना शनी पेठ पोलिसांनी शनिवारी सकाळी जेरबंद केले. यातील बाविस्कर हा सराईत गुन्हेगार आहे तर परदेशी हा मुक्त विद्यापीठात बी.कॉमच्या दुसर्‍या वर्षाचे शिक्षण घेत आहे.सध्या तो सेल्समनचे काम करतो. त्याच्या मदतीने बाविस्करने घरफोडी केली होती.
३ जून रोजी या सोनार यांच्या बंद घराचे कुलूप तोडून साडे ७७ हजार ८८७ रुपयांचे दागिने लंपास केले होते.दरम्यान याच दिवशी एसएमआयटी परीसरातील गुड्डुराजानगरात गोरखनाथ काशीनाथ वाणी या बांधकाम व्यावसायिकाच्या घरातूनही २५ हजाराच्यावर रोकड लांबवण्यात आली होती. दोन्ही ठिकाणी चोरीची सारखीच पध्दत असल्याने या दोघांचा त्यात सहभाग आहे का? याची पोलीस चौकशी करीत आहेत.
आयुष्याची कमाई मिळाली
नारायण सोनार हे सेवानिवृत्त असून निवृत्तीनंतर जमलेल्या पैशात त्यांनी दागिने करुन ठेवले होते. सुन गायत्री यांच्या पगाराचे डब्यात ठेवलेले सात हजार रुपया सुरक्षित राहिली आहे.आयुष्याची कमाई चोरट्यांनी चोरुन नेल्याने ते चिंतेत होते.या घटनेमुळे त्यांची सून अक्षरश: रडल्या होत्या. गुन्हा उघडकीस आल्याचे समजल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलला होता.
श्वानने दाखविला होता माग
घटनेच्या वेळी श्वान व ठसे पथकाला पाचारण करण्यात आले होते. तेव्हा कांचन नगरच्या दिशेने श्वानने माग दाखविला होता, त्यामुळे चोरटा याच भागातील असल्याचा संशय होता. परिसरातून माहिती काढली असता बाविस्कर हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याने त्याच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. दागिने विक्री करतांना चोरटा हमखास सापडेल असे पोलिसांनी या भागात जाहिर केले होते, त्यामुळे बाविस्कर याने दोन महिने दागिनेच विकले नाहीत असे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी सांगितले.
चोरी पाच लाखाची नोंद ७७ हजाराची
चोरट्याने रॉडच्या सहाय्याने दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता. कपाटातील लॉकरमधून पाच तोळे सोने चोरून नेले. यात मंगल पोत, अंगठी, कानातले अशा दागिने असा पाच लाख रुपयांचा ऐवज चोरी गेल्याचे सोनार यांनी तेव्हा सांगितले होते, मात्र पोलीस स्टेशनला ७७ हजार ८८७ रुपयाच्या दागिन्याची नोंद करण्यात आली होती.