शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात इमारत कोसळून ८ जण ठार

By admin | Updated: August 21, 2016 03:37 IST

मध्य प्रदेशात मुसळधार पावसामुळे शनिवारी दोन इमारती कोसळून आठ जण मृत्युमुखी पडले. सागर आणि सतना या दोन जिल्ह्यात या दुर्घटना घडल्या.

मैहर : मध्य प्रदेशात मुसळधार पावसामुळे शनिवारी दोन इमारती कोसळून आठ जण मृत्युमुखी पडले. सागर आणि सतना या दोन जिल्ह्यात या दुर्घटना घडल्या. सागर जिल्ह्याच्या राहतगड भागात शनिवारी पहाटे कच्चे घर कोसळून सात ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. मेहताब यांचे हे घर होते. या दुर्घटनेत घरातील सात जणांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला, तर घरमालक मेहताब (५९) व त्यांची दोन मुले लखन (२६) आणि महेंद्र (२३) हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. घर कोसळले, तेव्हा घरातील लोक गाढ झोपेत होते. जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून, त्यामुळेच ही दुर्घटना घडली, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधिक्षक विवेक अग्रवाल यांनी दिली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मेहताब यांची पत्नी मोनाराणी (५५), दोन मुलगे विकास (१८) आणि नितीन (१४), मुलगी संजना (११) यांच्याशिवाय कल्लू (३०), त्याची पत्नी माया (२५) आणि या दाम्पत्याची मुलगी तमन्ना (१८ महिने) यांचा मृतांत समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली असून, अधिक तपास सुरू आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले. सरकारी इमारत जमीनदोस्तसतना जिल्ह्यात नवी बहुमजली इमारत कोसळून एक महिला ठार तर सात जण जखमी झाले. मैहर भागातील ही तीन मजली निवासी व व्यवसायिक इमारत मध्य प्रदेश गृहनिर्माण विभागाने बांधली होती. या दुर्घटनेत एका अज्ञात महिलेचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. ढिगाऱ्याखाली आणखी नऊ ते १२ लोक अडकले असून, त्यांना वाचविण्यासाठी मदत व बचावकार्य सुरू आहे, असे जिल्हाधिकारी नरेश पाल यांनी सांगितले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निकृष्ठ बांधकाम साहित्य वापरल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. २०१३-१४ मध्ये बांधलेल्या तळमजल्यावर २२ दुकाने आणि २०१४-१५ मध्ये बांधण्यात आलेल्या पहिला आणि दुसऱ्या मजल्यावर २० सदनिका होत्या. या इमारतीमध्ये दोन तीन दिवसांपासून पाणी घुसले होते.