शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना आणा ऑफीसमध्ये, मंत्रालय करणार देखभाल

By admin | Updated: April 12, 2015 12:59 IST

केंद्र सरकारमधील मंत्रालयांमध्ये काम करणा-या महिला कर्मचारी व अधिका-यांना आता त्यांच्या लहान मुलांनाही ऑफीसमध्ये नेता येणार आहे.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 12 - केंद्र सरकारमधील मंत्रालयांमध्ये काम करणा-या महिला कर्मचारी व अधिका-यांना आता त्यांच्या लहान मुलांनाही ऑफीसमध्ये नेता येणार आहे.  केंद्र सरकारने प्रत्येक मंत्रालयात लहान मुलांसाठी एक स्वतंत्र कक्ष उभारण्याच्या हालचाली सुरु केल्या असून मंत्रालयात काम करणा-या महिला त्यांच्या लहान मुलांना या कक्षात ठेवता येणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रत्येक मंत्रालयाच्या सचिवांना त्यांच्या विभागात काम करणा-या महिलांची एक यादी तयार करण्यास सांगितले आहे. या यादीमध्ये लहान मुल असलेल्या महिला कर्मचा-यांचाच समावेश असेल. मंत्रालयात असा कक्ष सुरु करण्यासाठी किमान 15 महिला कर्मचा-यांची आवश्यकता असेल. मंत्रालयात लहान मुलं असलेल्या 15 महिला असतील त्या मंत्रालयात लहान मुलांसाठी एक कक्ष निर्माण करावे लागेल. संबंधीत महिला दररोज त्यांच्या मुलांनाही ऑफीसमध्ये आणू शकतील. कक्षात या मुलांची देखभाल करण्यासाठी एक प्रशिक्षित नर्स नेमली जाईल. या नर्सचा पगार संबंधीत मंत्रालयालाच द्यावा लागेल. केंद्र सरकारचे कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालय या कक्षाच्या निर्मितीसाठी पाच लाख रुपये देईल. या कक्षात लहान मुलांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत ठेवता येईल.