संक्षिप्त

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:14+5:302015-03-20T22:40:14+5:30

मुख्य अंक पान २ साठी

Brief | संक्षिप्त

संक्षिप्त

ख्य अंक पान २ साठी
अनाथ मुलांना सायकल वाटप
पुणे : कोथरूड येथील रोहन गार्डन गृहरचना संस्थेच्या वतीने आवारतील न वापरातील सोळा सायकली सामाजिक बाधिलकीच्या उद्देशाने सरस्वती अनाथ शिक्षण आश्रमातील मुलांना भेट देण्यात आल्या. या वेळी कांचन चुनेकर, प्रकाश चुनेकर आदी उपस्थित होते.
फोटो
------
जनसागर परिवार सन्मान
पुणे : सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक व प्रशासकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींनाजनसागर परिवाराच्या वतीने जनसागर परिवार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी परिवाराचे अध्यक्ष सादिक लुकडे, उल्हास पवार, रमेश बागवे, अविनाश बागवे, नुरूद्दीन सोमजी, अभय छाजेड, ॲड. प्रताप परदेशी आदी उपस्थित होते.
---------
वार्षिक स्नेहसंमेलन
पुणे : जीवन ज्योत मंडळ या मतिमंदासाठी काम करणार्‍या संस्थेने शाळा व उद्योग केंद्राचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले होते. या वेळी दिलीप प्रभावळकर, सचिव रा. चि. इनामदार, उपाध्यक्ष मीना माईनकर, मुख्याध्यापक भामरे, आनंद अडसूळ आदी उपस्थित होते.
----
आम्ही एकपात्री
पुणे : आम्ही एकपात्री कलाकारांच्या राज्यस्तरीय संस्थेच्या अध्यक्षपदी एकपत्री कलाकार वंदन राम नगरकर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष उज्ज्वला कुलकर्णी, बंडा जोशी, सचिव संतोष चोरदिया, सहसचिव चंद्रकांत परांजपे,़ खजिनदार अनिल गुंजाळ, प्रसिध्द प्रमुख शेखर केदारी तर कार्यक्रम समितीत मारूती यादव, डॉ. मृण्मयी भजक, बाबासाहेब खराडे, मोनिका जोशी यांचा समावेश आहे.
-----
छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
पुणे : अखिल भारतीय युवक महासंघाच्या वतीने डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास वृत्तपत्र संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळी सरचिटणीस नामदेव मानकर, युवक अध्यक्ष युवराज दिसले, अमित जाधव, उपाध्यक्ष दत्तात्रय सपकाळ, अरूण निवंगुणे, यशवंत वादवणे, रमेश उभे आदी उपस्थित होते.
फोटो
------

Web Title: Brief