राहुल यांच्यावर प्रश्नांचे झाले बूमरँग

By Admin | Updated: November 26, 2015 00:05 IST2015-11-26T00:05:05+5:302015-11-26T00:05:05+5:30

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियान खरंच काम करतंय काय,’ या प्रश्नाला उपस्थित विद्यार्थ्यांकडून ‘येस’ असे उत्तर

Boomerang questions Rahul Gandhi | राहुल यांच्यावर प्रश्नांचे झाले बूमरँग

राहुल यांच्यावर प्रश्नांचे झाले बूमरँग

बंगळुरू : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियान खरंच काम करतंय काय,’ या प्रश्नाला उपस्थित विद्यार्थ्यांकडून ‘येस’ असे उत्तर मिळाल्याने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची बुधवारी मोठी अडचण झाली.
बेंगळुरूतील प्रतिष्ठित माऊंट कार्मेल कॉलेजमध्ये महिला सक्षमीकरणावर विद्यार्थिनींना संबोधित करताना राहुल गांधी यांनी; स्वच्छ भारत अभियान यशस्वी ठरत आहे काय, असा प्रश्न विचारला आणि त्यावर विद्यार्थिनींनी ‘येस’ असे उत्तर दिले.
यावेळी विद्यार्थिनींनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना राहुल गांधी यांनी उत्तर दिले नाही. पण काही प्रश्नांवर त्यांना बचावात्मक भूमिका घ्यावी लागली. (वृत्तसंस्था)

Web Title: Boomerang questions Rahul Gandhi