शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

एक्स बॉयफ्रेंडच्या चिंधड्या उडवण्यासाठी तिने बनवला बॉम्ब

By admin | Updated: October 12, 2016 15:24 IST

एका महिलेने आपल्या एक्स-बॉयफ्रेंडचा बदला घेऊन त्याच्या शरीराच्या चिंधड्या-चिंधड्या उडवण्यासाठी त्याचे घर बॉम्बने उडवण्याचा कट आखला होता.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 12 - एका महिलेने आपल्या एक्स-बॉयफ्रेंडच्या शरीराच्या चिंधड्या-चिंधड्या उडवण्यासाठी त्याचे रहाते घर बॉम्बने उडवण्याचा कट रचला होता. एक्स-बॉयफ्रेंडने सोडल्याचा सूड उगवून त्याची हत्या करण्यासाठी तिने हा कट रचला होता.  हरियाणातील पालवल जिल्ह्यातील ही घटना आहे. आरती असे या महिलेचे नाव असून हा कट रचण्यासाठी तिने प्रदीप दरोगा नावाच्या मित्राची मदत घेतली. फटाक्यांची दारू, काचांचे तुकडे, दगडांचा वापर करुन या दोघांनी तीन बॉम्ब बनवले. प्रदीपसोबतदेखील आरतीचे या आधी प्रेमप्रकरण होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
एका हत्या प्रकरणात आरती आणि प्रदीपला पोलिसांनी चौकशी ताब्यात घेतले असता, ही धक्कादायक माहिती उघड झाली. 2010 साली आरतीची राकेश नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले, त्यानंतर राकेश पत्नी आणि तीन मुलांना सोडून आरतीसोबत राहू लागला. मात्र सहा वर्षांनंतर राकेशने स्वतःच्या पत्नी-मुलांकडे परतण्याचा निर्णय घेतला. राकेश आणि त्याच्या कुटुंबीयांना एकत्र आणण्यासाठी बाबूलाल नावाच्या नातेवाईकाने त्याला मदत केली. यामुळे संतापलेल्या आरतीने राकेश आणि बाबूलालचा सूड घेण्याचा ठरवले. राकेशला मारण्याआधी तिने 3 ऑक्टोबर रोजी बाबूलालची गळा चिरुन हत्या केली. राकेशसोबतच्या प्रेमप्रकरणाचा अंत होण्यास कारणीभूत ठरलेल्या बाबूलालला ठार मारल्याची कबुली आरतीने पोलीस चौकशीत दिली.
 
त्यानंतर, तिने शमशाहबाद कॉलनीतील राकेशच्या घरात प्रदीपच्या मदतीने बॉम्ब ठेवले. आरतीने आपल्याविरोधात एवढा भयानक कट रचल्याची भणकही राकेशला लागली नव्हती. मात्र बाबूलाल हत्याप्रकरणाच्या चौकशीदरम्यान ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरतीचा कट उधळला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, तीनही बॉम्ब निकामी केले. हे बॉम्ब निकामी करण्यासाठी जवळपास तीन ते चार तास लागले, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक अब्बास खान यांनी दिली. दरम्यान, आरती आणि प्रदीपवर काही वर्षांपूर्वी अलिगडमध्येही एकाची हत्या केल्याचा आरोप आहे. तर प्रदीपविरोधात उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीचे एकूण 13 खटले दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.