अनैतिक संबंधातून खून

By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:24+5:302015-03-06T23:07:24+5:30

अकोले : पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरुन शिक्षकाने गावातीलच एका तीसवर्षीय व्यक्तीचा खून केल्याची घटना तालुक्यातील विश्रामगडाच्या पायथ्याशी असलेल्या प˜ेवाडी या आदिवासी खेड्यात गुरुवारी होळीच्या दिवशी मध्यरात्री घडली.

Bloodshed in Immoral Relationships | अनैतिक संबंधातून खून

अनैतिक संबंधातून खून

ोले : पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरुन शिक्षकाने गावातीलच एका तीसवर्षीय व्यक्तीचा खून केल्याची घटना तालुक्यातील विश्रामगडाच्या पायथ्याशी असलेल्या पट्टेवाडी या आदिवासी खेड्यात गुरुवारी होळीच्या दिवशी मध्यरात्री घडली.
होळी पौर्णिमेच्या रात्री गावात आदिवासींचा लोकगीतांचा जागर चालू असताना सोमनाथ भागा कुंदे (वय ३०) याला गावातीलच शिक्षक अर्जुन महादू निसरड याने बोलावून नेले. त्यानंतर सोमनाथ याचा खून झाल्याचे पहाटे दोन वाजता गावकर्‍यांना आढळले. घटनेनंतर अर्जुन स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला आणि खुनाची कबुली दिली. एकनाथ भागा कुंदे (वय २४, रा. पट्टेवाडी) यांच्या फिर्यादीवरुन अर्जुनविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला.
पट्टेवाडी गावापासून कोकणेवाडी गावाकडे जाणार्‍या डांबरी रस्त्यावर हा खून झाला. खुनाचा गुन्हा दाखल झाला असला तरी शुक्रवारी सायंकाळपर्यंत आरोपीस अटक दाखवली नव्हती. धारदार शस्त्राने मानेवर वार केल्याने सोमनाथ याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात समोर आले असून तालुक्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मयत सोमनाथ कुंदे व आरोपी अर्जुन या दोघांची घरे कोकणेवाडी रोडच्या बाजूला पट्टेवाडी शिवारात आहेत. पोलीस निरीक्षक एम. बी. पाटील यांच्या मार्गदशर्नाखाली अधिक तपास सुरु आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Bloodshed in Immoral Relationships