शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
6
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
7
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
8
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
9
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
10
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
11
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
12
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
13
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
14
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 06:12 IST

नव्या मंत्रिमंडळाचा आज गांधीनगर येथे शपथविधी, किमान दहा नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी

गांधीनगर  : भाजपचे सरकार असलेल्या गुजरातमध्ये गुरुवारी वेगाने राजकीय हालचाली घडल्या. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व १६ मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. शुक्रवारी सकाळी गांधीनगरमध्ये सकाळी ११.३० वाजता नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यात काेणाला संधी मिळते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, मंत्रिमंडळ विस्तारात सुमारे १० नवीन मंत्री मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात, सध्याच्या मंत्रिमंडळातील जवळपास निम्मे मंत्री बदलले जाऊ शकतात. तसेच मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असून, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आमदारही मंत्री होऊ शकतात अशी चर्चा आहे. 

गुजरात मंत्रिमंडळाची रचना २७ मंत्री संविधानानुसार नियुक्त करता येतात.  (सभागृहाच्या एकूण संख्येच्या १५ टक्के)   गतकाळातील धक्कातंत्र २०२१ मध्ये मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ बदलले, त्यानंतर भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री झाले.

पाटीदार आणि ठाकोर समाजाला मंत्रिमंडळात प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवारी रात्री गुजरातमध्ये पोहोचले असून भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा उद्या शुक्रवारी सकाळी गुजरातमध्ये येणार आहेत. 

२०२७च्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपची खास रणनीतीमागील ३ वर्षांत गुजरातच्या मंत्रिमंडळात कोणताही बदल झालेला नाही. आता २०२७च्या विधानसभा निवडणुकांची तयारी म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे.अनेक मंत्र्यांचे कामकाज समाधानकारक नव्हते. विशेषतः विसावदर विधानसभा पोटनिवडणुकीत आपचा उमेदवार विजयी झाला. या अपयशातून भाजपने धडा घेतला व राजकीय धक्कातंत्र वापरत गुजरातमध्ये मंत्रिमंडळामध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला.

भाजपतील गुजरातमधील जुन्या, प्रभावशाली व काही काळ बाजूला ठेवण्यात आलेल्या नेत्यांना पुन्हा जबाबदारी देण्याची शक्यता आहे. सत्ताविरोधी लाट टाळण्यासाठी मंत्रिमंडळात बदल करणे भाजप पक्षश्रेष्ठींना आवश्यक वाटले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gujarat BJP Shocker: All 16 Ministers Resign Before Cabinet Reshuffle

Web Summary : In a surprise move, all Gujarat ministers resigned, paving the way for a cabinet reshuffle. New faces are expected, potentially including Congress defectors. The BJP aims to prepare for the 2027 elections and address dissatisfaction with some ministers' performance, especially after recent election setbacks.
टॅग्स :GujaratगुजरातBJPभाजपा