शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात भाजपाचा झंझावात

By admin | Updated: October 20, 2014 05:06 IST

२००९च्या निवडणुकीत या पक्षाला केवळ १९ जागा मिळाल्या होत्या. या वेळी त्यात तब्बल २५ जागांची भर पडून ४४ जागांसह हा पक्ष क्रमांक १वर आला आहे.

दिलीप तिखिलेलोकसभा निवडणुकीतील मोदी प्रभाव आणि अ‍ॅन्टिइंकम्बसीचा फायदा उचलत विदर्भात भाजपाने जोरदार मुसंडी मारली. २००९च्या निवडणुकीत या पक्षाला केवळ १९ जागा मिळाल्या होत्या. या वेळी त्यात तब्बल २५ जागांची भर पडून ४४ जागांसह हा पक्ष क्रमांक १वर आला आहे.आघाडी आणि युती तुटल्यानंतर विदर्भात बहुतांश ठिकाणी चौरंगी लढती होत्या. संबंध तुटल्याचा सर्वाधिक फायदा भाजपालाच झाला. राष्ट्रवादी-काँग्रेस आपसांतच भिडल्यामुळे दोन्ही पक्षांचे मोठे नुकसान झाले. शिवसेनेचा तसाही विदर्भात जोर नव्हता, त्यामुळे भाजपाला लढत कठीण गेली नाही. याउलट काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. यात अनेक माजी मंत्र्यांचा समावेश आहे.तिकडे वऱ्हाड प्रांतातही भाजपाने या वेळी मुसंडी मारली आहे. अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांतील १५पैकी ९ जागांवर भगवा फडकला आहे. काँग्रेसच्या वाट्याला केवळ ३ तर सेनेला २ जागा मिळाल्या. या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदींची एकमेव सभा होऊनही भाजपाला लक्षणीय यश मिळाले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सभा घेतलेल्या बुलडाण्यात काँग्रेसला यश लाभले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वाशिम व बुलडाणा जिल्ह्यांत सभा घेऊनही त्यांच्या पक्षाला खातेही उघडता आले नाही. या वेळी लोकांनी नकाराधिकाराचाही मोठ्या प्रमाणात वापर केला. गडचिरोलीत तर ‘नोटा’ला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. विदर्भातील चार जिल्ह्यांतून काँग्रेस हद्दपार झाली.आणखी एक उल्लेखनीय बाब. याला योगायोग म्हणा किंवा आणखी काही़ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विदर्भातील ब्रह्मपुरी, गोंदिया, चांदूर रेल्वे (धामणगाव रेल्वे) येथे जाहीर सभा घेतल्या पण या तिन्ही ठिकाणी भाजपा उमेदवार पराभूत झाले. सोनिया गांधी ब्रह्मपुरी, गोंदियाला जाऊन आल्या तेथील काँग्रेस उमेदवार विजयी झाले.