शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

संघाच्या पूर्णवेळ सदस्यांवर भाजपाची निवडणूक जबाबदारी

By admin | Updated: September 15, 2016 02:49 IST

मोदी सरकारची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवत जनाधार भक्कम करण्यासाठी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आलेल्या पूर्णवेळ सदस्यांवर निवडणुकीत विशेष जबाबदारी सोपविणार आहे

नितीन अग्रवाल,  नवी दिल्लीमोदी सरकारची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवत जनाधार भक्कम करण्यासाठी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आलेल्या पूर्णवेळ सदस्यांवर निवडणुकीत विशेष जबाबदारी सोपविणार आहे. संघाची पार्श्वभूमी असलेले प्रभावशाली नेते लोकांना प्रभावित करणाऱ्या लोकांची निवड करून पक्षासाठी मताधार तयार करण्याचे काम करतील.सूत्रांनुसार पक्षाचे संघटक समाजाला दिग्दर्शन करणारे डॉक्टर, वकील, शिक्षक यासारख्या प्रभावी लोकांच्या माध्यमातून काम करतील. समाजातील विविध स्तरांतील लोकांशी याचा संपर्क असतो. ते जे सांगतात, त्याचे अनुसरणही जनता करते. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, गुजरात आणि कर्नाटकात होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजप कामाला लागला आहे.उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटकात पुन्हा सत्ता मिळविण्याचा, तर अन्य राज्यांतील सत्ता टिकविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. सर्व राज्यांत मोदी सरकारच्या कामगिरीवर मते मिळविण्याचा भाजपचा इरादा आहे; परंतु आजवरच्या कार्यक्रमातून यात यश मिळाल्याचे दिसत नाही. पक्ष आणि संघाच्या वरिष्ठ नेत्यांचेही याबाबतीत पुरेसे समाधान झालेले नाही. त्या पार्श्वभूमीवर मागील चार दिवस दिल्लीलगत सूरजकुंड येथे भाजप आणि संघाचे प्रमुख नेते विचारमंथनासाठी जमले होते.विविध राज्यांतून संघटन सचिवांशिवाय या बैठकीत भाजप अध्यक्ष अमित शहा, डॉ. कृष्णगोपाल (भाजप-संघ समन्वयक) सरचिटणीस रामलाल, जम्मू-काश्मीरचे प्रभारी राममाधव यांचा सहभाग होता. या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती पंतप्रधान मोदी यांना देण्यात आली आहे. प्रत्येक राज्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासह सरकारच्या कामगिरीवर चर्चा करण्यात आली. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदललेली प्रतिमा आणि जागतिक स्तरावर भारताचे वाढलेले महत्त्व याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या धोरणांवरही चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत जागतिक पातळीवरील सरकारची कामगिरी आणि विविध देशांत अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.