शहरं
Join us  
Trending Stories
1
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
2
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
3
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
4
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
5
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
6
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
7
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
8
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
9
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
10
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
11
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
12
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
13
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
14
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
15
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
16
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
17
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
18
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
19
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
20
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!

BJP-Congress: काँग्रेसची खोचक टीका, RSSचा पोषाख जाळल्याचा फोटो ट्विट; भाजपचा गांधींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 1:35 PM

Bharat Jodo Yatra: RSSचा पोषाख जाळल्याचा फोटो काँग्रेसने शेअर केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

BJP-Congress: काँग्रेसने(Congress) देशभर 'भारत जोडो' (Bharat Jodo Yatra) यात्रा सुरू केली आहे. स्वतः राहुल गांधी इतर काँग्रेस नेत्यांसह या देशभर फिरणार आहेत. यादरम्यान काँग्रेसने RSSबद्दल केलेल्या एका ट्विटवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसच्या ट्विटवर भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर निशाणा साधला. गांधी कुटुंबाच्या सांगण्यावरूनच संघाचा अपमान करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

काँग्रेसच्या ट्विटवरून वाद वाढलाकाँग्रेसने भारत जोडो यात्रेदरम्यान अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले, ज्यामध्ये आरएसएसच्या पोशाखाला आग लावल्याचे दिसत आहे. या फोटोवर 'अजून 145 दिवस बाकी' असेही लिहिले आहे. फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'देशाला द्वेषाच्या वातावरणातून मुक्त करण्याच्या आणि आरएसएस-भाजपने केलेल्या नुकसानीची भरपाई करण्याच्या दिशेने आम्ही एक-एक पाऊल टाकत आहोत,' असे लिहिले आहे.

जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया टाळलीकाँग्रेस नेते जयराम रमेश  (Jairam Ramesh) यांनी या ट्विटवर काहीही बोलण्यास नकार दिला. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, 'मला टी-शर्ट, अंडरवेअरबद्दल बोलायचे नाही. जर त्यांना (भाजप) कंटेनर, शूज किंवा टी-शर्टबद्दल मुद्दा काढायचा असेल तर ते घाबरले आहेत आणि काहीही बोलू शकतात हे दिसून येत आहे. यावर बोलणे बालिशपणाचे असेल. सोशल मीडियावर 'लबाडांची फॅक्टरी' ओव्हरटाईम करत आहे,' असे ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRahul Gandhiराहुल गांधीSambit Patraसंबित पात्रा