BJP on the verge of splitting in Rajasthan now? 12 MLAs of Vasundhara group sent to Gujarat | राजस्थानमध्ये आता भाजपाच फुटीच्या मार्गावर? वसुंधरा गटाच्या १२ आमदारांची गुजरातमध्ये पाठवणी

राजस्थानमध्ये आता भाजपाच फुटीच्या मार्गावर? वसुंधरा गटाच्या १२ आमदारांची गुजरातमध्ये पाठवणी

ठळक मुद्देराजस्थानमधील गहलोत सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपालाच आता फुटीची चिंताविधानसभेच्या १४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य तुटीपासून वाचण्यासाठी भाजपाची तयारीखबरदारी म्हणून १२ आमदारांची गुजरातमध्ये केली पाठवणी

जयपूर - राजस्थानमध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यात दररोज नवनवी वळणे येत आहेत. दरम्यान, राजस्थानमधील गहलोत सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपालाच आता फुटीची चिंता सतावत आहे. राज्याच्या विधानसभेच्या १४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य तुटीपासून वाचण्यासाठी भाजपाने तयारी सुरू केली असून, खबरदारी म्हणून १२ आमदारांची गुजरातमध्ये पाठवणी करण्यात आली आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार हे १२ आमदार उदयपूर भागातील आहेत. मात्र हे आमदार स्वत:च गुजरातमध्ये फिरण्यासाठी गेले आहेत, तसेच आज सोमनाथाचे दर्शन घेणार आहेत, असे सांगण्यात येत आहे. मात्र सूत्रांच्या म्हणण्यानुसार भाजपानेच या आमदारांची गुजरातमध्ये पाठवणी केली आहे. दरम्यान, अजून काही आमदारांची मध्य प्रदेशमध्ये पाठवणी करण्यात येण्याची शक्यता आहे.

भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा बसपाच्या आमदारांच्या काँग्रेसमधील विलीनीकरणावर उच्च न्यायालयाकडून येणाऱ्या निकालाची वाट पाहणार आहे. जर हा निकाल काँग्रेसच्या विरोधात आला तर भाजपा आपल्या आमदारांची भक्कम बांढणी करणार आहे. त्याचे कारण म्हणजे काँग्रेस बसपाप्रमाणेच भाजपाच्या आमदारांनाही फोडण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर या आमदारांची गुजरातमध्ये पाठवणी करण्यात आली आहे. त्यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच गुजरातमध्ये पाठवण्यात आलेल्या आमदारांमध्ये वसुंधरा राजेंच्या समर्थकांचा समावेश आहे. दरम्यान वसुंधरा राजे यांनी नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पक्षाच्या कार्यशैलीबाबत नाराजी व्यक्त केल्याचेही वृत्त आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: BJP on the verge of splitting in Rajasthan now? 12 MLAs of Vasundhara group sent to Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.