शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये भाजपाकडून सत्तेसाठी पैशाचा वापर- इरोम शर्मिला

By admin | Updated: March 14, 2017 13:54 IST

मणिपूरमध्ये सत्तेचा तिढा कायम असतानाच सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

ऑनलाइन लोकमतकोइम्बतूर, दि. 14 - मणिपूरमध्ये सत्तेचा तिढा कायम असतानाच सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. मणिपूर राज्यात सत्ता मिळवण्यासाठी भाजपानं वारेमाप पैसा आणि शक्तीचा वापर केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी केला आहे. मणिपूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक 28 जागा मिळून क्रमांक 1चा पक्ष ठरला आहे. मात्र तरीही मणिपूरमध्ये सत्ता स्थापन करण्याचा भाजपाने दावा केला आहे. मणिपूरमध्ये भाजपा दोन नंबरचा पक्ष ठरला असतानाही भाजपाकडून एन. बिरेन सिंह यांची मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. इरोम शर्मिला विमानानं केरळला जात असताना त्यांनी कोइम्बतूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरच पत्रकारांशी संवाद साधला. मणिपूरमधील पराभवामुळे इरोम शर्मिला केरळमधल्या मेडिटेशन सेंटरमध्ये एक महिना व्यतित करणार आहेत. निवडणुकीच्या निकालानं मी निराश आहे. त्यामुळेच महिन्याभरासाठी राज्य सोडण्याचा विचार केला आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत. इरोम शर्मिला यांना मुख्यमंत्री इबोबी सिंह यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. शर्मिला यांना अवघी 90 मते मिळाल्यानं राजकीय वर्तुळात त्या चर्चेत आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाने सुरुवातीला निवडणुकीत पैसा आणि शक्तीचा वापर केला. आता सत्ता स्थापनेतही तेच करण्यात येत आहे, असं म्हणत त्यांनी भाजपाला लक्ष्यही केलं आहे.(मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांचा राजीनामा) मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा सोमवारी रात्री उशिरा राजीनामा दिला. ओकराम इबोबी सिंह यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे राज्यपाल नजमा हेमतुल्ला यांनी सांगितले होते. यावर, ओकराम इबोबी सिंह यांनी कॉंग्रेसकडे बहुमत असल्याचा दावा करत राजीनामा देण्यास नकार दिला होता. मात्र, त्यानंतर काही तासानंतर त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली.