शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
5
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
6
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
7
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
8
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
9
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
12
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
13
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
14
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
15
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
17
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
18
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
19
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
20
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

'मतं मिळवण्यासाठी भाजपाकडून जवानांचा प्याद्यांसारखा वापर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 11:43 IST

'काश्मीरमधील परिस्थिती निवळली असेल, तर ९ लाख जवान तिथे कशासाठी हवेत?'

श्रीनगर: निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी भाजपाकडून जवानांचा प्याद्यांसारखा वापर होत असल्याचा आरोप जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींनी केला आहे. भाजपाला जवानांची आणि काश्मिरींची कोणतीही चिंता नसल्याचंदेखील मुफ्ती म्हणाल्या. काश्मीरमधून कलम ३७० काढल्यानंतर मुफ्ती नजरकैदेत आहेत.  मेहबूबा मुफ्ती नदरकैदेत असल्यानं त्यांची कन्या इल्तिजा त्यांचं सोशल मीडिया अकाऊंट हाताळते. इल्तिजा यांनी मेहबूबा यांच्या वतीनं ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला. 'भाजपाकडून जवानांचा वापर होत आहे. जवानांचं शौर्य आणि त्यांचा त्याग मतांसाठी वापरला जात आहे. काश्मीर खोऱ्यातील अशांतता कायम राखण्यासाठी जवानांना प्यादं बनवलं जात आहे. सत्ताधाऱ्यांना काश्मिरींची आणि जवानांची चिंता नाही. त्यांना केवळ निवडणुका जिंकण्यात रस आहे,' असं ट्विट मुफ्तींच्या अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे.  लष्कराचा वापर आंदोलकांना भिडण्यासाठी नव्हे, तर सीमांचं संरक्षण करण्यासाठी व्हायला हवा, असंदेखील मुफ्तींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'काश्मीरमधील परिस्थिती निवळली असेल, तर मग इथे ९ लाख जवान काय करत आहेत? ते पाकिस्तानकडून होणारे हल्ले परतवण्यासाठी नव्हे, तर आंदोलकांना चिरडण्यासाठी काश्मीरमध्ये आहेत. आंदोलन मोडून काढणं हे लष्कराचं काम नाही. सीमांचं संरक्षण करणं ही लष्कराची जबाबदारी आहे,' अशा शब्दांमध्ये मुफ्तींनी भाजपा सरकावर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान